आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक: सरदार चौकात आजही भीती अन् धास्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नुसते सरदार चौक म्हटले तरी गेला सिंहस्थ कुंभमेळा आठवणीत असलेल्यांच्या अंगाचा थरकाप उडाल्यावाचून राहात नाही. याच चौकात 2003 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती न होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असतानाच तेथील रहिवासी व दुकानदार मात्र रस्ता विस्तारीकरणात आपल्या वडिलोपार्जित मिळकती जाण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.
एकेरी मार्गच ठेवावा
इमारतींची तोडफोड करण्यापेक्षा योग्य व्यवस्थापन करून हा मार्ग केवळ साधू-महंतांसाठी एकेरी करावा. भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करता येईल.
-हितल पटेल

वेठीस धरण्याचा प्रकार
आमच्या उपजीविकेची साधने येथे आहेत. सिंहस्थाच्या चार दिवसांसाठी त्यावर पाणी फिरवणार का? आधी उपजीविकेसह पुनर्वसन करा. मगच कारवाई करा.
-राहुल विसपुते

आम्ही जायचं कुठं..?
घरात दहा लोक आहेत. दोघे भाऊ कमावते आहोत. त्यात मी अपंग. विस्तारीकरणात दुकानच गेले तर पोट कसे भरायचे?
-विजय पाटील

अतिक्रमण काढाआधी अतिक्रमणे काढा. घरांची तोडफोड करण्याची गरज नाही. सरसकट घरांवर वरवंटा फिरवणे चुकीचे ठरेल.
-रामदास जव्हेरी27 ऑगस्ट 2003 रोजी दुपारी सरदार चौकात झालेल्या चेंगराचेंगरीत 32 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची नुसती आठवण काढली तरी चौकातील रहिवाशांसमोर त्या घटनेचा संपूर्ण पटच उभा राहतो. सकाळी अनुभवलेला भाविकांचा प्रचंड उत्साह आणि दुपारनंतर तेथे मृत्यूने घातलेले थैमान आज दशकभरानंतरही त्यांच्या डोळ्यासमोरून हटत नाही. रहिवाशांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यथा मांडल्या.