आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"ग्लाेबल नाशिककर' स्मार्ट सिटीसाठी कनेक्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक अधिक स्मार्ट करण्यासाठी अाधुनिक तंत्रज्ञानाचा उपयाेग, शहरासमाेरील मुख्य अाव्हाने ती पेलण्यासाठी अवलंबावयाच्या याेजना वा प्रकल्पांविषयी विचारमंथन करण्यासाठी साेमवारी (दि. २८) कुंभथाॅनच्या माध्यमातून एकत्र अालेल्या २५० तरुण तंत्रज्ञांनी त्यावर उपाययाेजना सुचविल्या. तसेच, ग्लाेबल प्लॅटफाॅर्मवर नाेकरी वा व्यवसायानिमित्त बाहेर गेलेल्या नाशिककरांना पुन्हा अापल्या शहराशी जाेडण्यासाठी ‘ग्लाेबल नाशिककर’ नावाचे नवे संकेतस्थळही या चर्चासत्रात विकसित करण्यात अाले. त्यावर ते शहर विकासाच्या याेजना सुचवू शकणार अाहेत.
कुंभथाॅन नाशिक महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘अायडिएशन अाॅफ स्मार्ट सिटी’ या चर्चासत्राचे अायाेजन सिटी सेंटर माॅलमधील बॅन्क्वेट हाॅलमध्ये करण्यात अाले हाेते. या चर्चासत्रासाठी महापालिकेचे अधिकारी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात अाले.

सूचना पाठविणार क्रिसिलला
यावेळी विद्यार्थी अाणि तज्ज्ञ नाशिककरांकडून नाशिकमधील महत्त्वाची अाव्हाने अाणि ती कमी करण्यासाठीच्या सूचना यावर समूह चर्चा करण्यात अाली. यात प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, परिसर विकास, अाराेग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता, पर्यावरण, पर्यटन, कला, करमणूक, संस्कृती, क्रीडा क्षेत्र अादींचा समावेश हाेता. अशा प्रकारची चर्चासत्रे यापुढेही टप्प्याटप्प्याने हाेणार असून, त्यातील महत्त्वाच्या सूचना स्मार्ट सिटीचा अाराखडा तयार करणाऱ्या क्रिसिल या संस्थेपर्यंत पाेहचविणार अाहेत.
{ रुग्ण हक्क समितीची स्थापना
{ गर्दीच्या ठिकाणी अधिक प्रसाधनगृहे
{ देहदान अवयव दानाच्या चळवळीस प्राेत्साहन
{ पाणीपट्टीत वाढ करण्याची गरज
{ पाणी सर्वत्र एकसमान
{ सार्वजनिक वाहतुकीसाठी अधिक बस सुसूत्र व्यवस्था
{ अत्याधुनिक वीजमीटर
{ लाेकांपर्यंत पाेहचणाऱ्या शासकीय अाराेग्य याेजना
{ अाजारांविषयीच्या माहितीचा अभाव
{ महापालिकेचे पाण्याचे परवडणारे दर
{ इ-गव्हर्नन्स पद्धती अधिक साेपी करण्याची गरज
{ साैरऊर्जेचा हाेणारा वापर
{ शैक्षणिक संस्था अाैद्याेगिक कारखान्यांत नसणारा संबंध
{ पुरातन वास्तुंविषयी जागृतीचा अभाव
{ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा खासगी वाहनांचा वापर अधिक