आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास अाराखड्यात समितीचे ११७ बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - नाशिक शहराच्या सुधारित प्रारूप शहर विकास अाराखड्यावर शेतकरी, मिळकतधारकांनी घेतलेल्या हजार १४९ हरकतींवर सुनावणी हाेऊन नियाेजन समितीने त्यात ११७ बदल करून हा अाराखडा शासनाला सादर केला अाहे. शासनाकडून अाराखड्याची दाेन ते तीन महिन्यांत अंमलबजावणी होण्याची शक्यता विभागीय नगरविकास विभागाचे नगररचनाकार किशाेर पाटील यांनी व्यक्त केली.

शहराचा सुधारित प्रारूप विकास अाराखडा २६ मे राेजी प्रसिद्ध झाल्यानंतर मुदतीत हजार १४९ हरकती प्राप्त झाल्या. हरकतींवर नगररचना मूल्यनिर्धारण विभागाचे सेवानिवृत्त संचालक विद्याधर देशपांडे, पुणे काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंगचे प्रा. डाॅ. संजय साेनार इंजिनिअर अॅण्ड इंटिरिअर डिझायनर अशाेक माेखा यांच्या त्रिसदस्यीय नियाेजन समितीने सुनावणी अहवाल पाच महिने २४ दिवसांच्या विक्रमी वेळेत सहसंचालक प्रकाश भुक्ते यांना सादर केला. हरकतींनुसार अाराखड्यात अारक्षण, रस्ता सर्वसाधारण स्वरूपाचे ११७ बदल करण्यात अाले. बदलांच्या अनुषंगाने विकास नियंत्रण प्राेत्साहन नियमावलीतील तरतुदींमध्ये बदल केला अाहे. विकास नियंत्रण नियमावलीमधील कलम १२७ ची तरतूद, अस्तित्वातील वापराबाबत माेजणी नकाशाच्या अनुषंगाने पडताळणी करण्याची तरतूद, अारक्षण स्थलांतराची तरतूद, तसेच अहवालात क्षेत्राबाबत नमूद टीप यामुळे अनेक अाक्षेपांबाबत निर्णयाची अावश्यकता राहिली नाही. विकास नियंत्रण प्राेत्साहन नियमावलीमध्ये जनहितार्थ तरतुदींचा समावेश असून, सुटसुटीत नियमावली, जनहिताच्या तरतुदींचा समावेश, विकास व्यवसायाला प्राेत्साहन, विकास नियंत्रण प्राेत्साहन नियमावलीत नवीन तरतुदींचा समावेश केल्याचे नगररचनाकार पाटील यांनी सांगितले.

अारक्षण अॅमिनिटी क्रेडिट बाँड : अारक्षणाच्याजागा पालिकेस हस्तांतरित केल्यास त्याचा भूसंपादन कायद्याप्रमाणे माेबदल्याच्या रकमेचा बाँड जमीनधारकास देण्यात येईल. बाँडमधील रक्कम पालिकेकडे विकास शुल्क, प्रीमियम आदी रूपाने भरावयाची अाहे.

या रकमेवर जमीनधारकास २० टक्के डिस्काउंट मिळणार अाहे, तसेच जमीनधारकाने अारक्षणाखालील जागा हस्तांतरित केल्यास त्याबदल्यात तेवढ्या क्षेत्राचा अॅमिनिटी क्रेडिट बाँड मिळेल. जमीनधारकाच्या इतर ठिकाणच्या जागेवर परवानगी घेताना जी अॅमिनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) साेडावी लागेल, ती साेडण्यापासून त्याला सूट मिळेल तेवढे क्षेत्र अॅमिनिटी क्रेडिट बाँडमधून कमी हाेईल.

जागेच्या बदल्यात दिली जाणार जागा
सुविधाक्षेत्राच्या माध्यमातून महापालिकेकडे ज्या जागा प्राप्त हाेणार अाहेत, त्या जागा अारक्षण असलेल्या जमीनमालकांना देऊन अारक्षणाखालील जागा ताब्यात घेण्याची तरतूद नव्याने करण्यात अाली अाहे. अशाप्रकारे देवाणघेवाण हाेण्याच्या जागेच्या किमतीत जाे फरक असेल, त्यासाठी जागा कमी-जास्त द्यावी लागणार अाहे.

विविध तरतुदींचा समावेश
शासनाला सादर अाराखड्यात टीडीअार दुप्पटएेवजी अडीचपट देण्याची अारक्षणाच्या माध्यमातून जमीनधारक काही जागा, बांधकाम महापालिकेस देऊन अारक्षण स्वत:च विकसित करण्याची तरतूद अाहे. वरील एक किंवा अनेक पद्धतींचा अवलंब करून अारक्षणाखालील जागा ताब्यात घेण्याची तरतूद नियमावलीत अाहे. शेती विभागात शैक्षणिक वापरासाठी ०.४० एवढ्या चटई क्षेत्र निर्देशांक मर्यादेपर्यंत विनाअभिमूल्य बांधकाम अनुज्ञेय केले अाहे. इमारतीच्या उंचीबाबत नवीन धाेरण अंतर्भूत असून, जागेवरील अस्तित्वातील परिस्थितीत भाैगाेलिक बाबींची अाखणी भूमी अभिलेख विभागाकडील नकाशा ग्राह्य धरण्याच्या तरतुदीचा समावेश अाहे.

बदलाचा नकाशा कार्यालयात
^सुधारित प्रारूप शहर विकास अाराखडा शासनाला सादर केला असून, येत्या दाेन ते तीन महिन्यांत शासनाकडून अाराखडा मंजूर हाेऊ शकताे. अाराखड्यात शासनाने माेठ्या स्वरूपाचे बदल केल्यास अाराखडा पुनर्प्रसिद्ध केला जाईल. अाराखड्यातील बदलाचा नकाशा माहितीसाठी कार्यालयात लावण्यात आला अाहे. अमर पाटील, नगररचनाकार