आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच पावलांनी हुकली ‘स्मार्ट सिटी’ची बस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’च्या मुद्यावरून वादात सापडलेला नाशिकचा स्मार्ट सिटी याेजनेतील सहभाग अवघ्या अडीच गुणांनी हुकल्याचे समाेर अाले अाहे. अाता दुसऱ्या फेरीत वर्णी लागण्यासाठी महापालिकेने मेअखेरीसच परिपूर्ण प्रस्ताव करण्याची तयारी सुरू केली अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर अवघ्या दाेन गुणांनी ‘स्मार्ट सिटी’तून बाद झाले अाहे. ९८ शहरांच्या यादीत नाशिकने ३४ क्रमांकावरील स्थान मिळवले अाहे.
या याेजनेसाठी नाशिकने कंबर कसली हाेती. अार्थिक खडखडाटामुळे ‘स्मार्ट सिटी’साठी केंद्र शासनाकडून येणारा निधी महापालिकेला माेलाचा हाेता, मात्र अटी-शर्ती समाेर अाल्यानंतर महापालिकेला केवळ गुंतवणूक करणे भाग असून, केंद्रासह अन्य निधी नियाेजनाचे सुकाणू ‘एसपीव्ही’कडेच राहणार असल्यामुळे नगरसेवकांच्या ताेंडचे पाणी पळाले. वर्षभरावर निवडणूक असताना, ‘स्मार्ट सिटी’साठी निधी दिल्यानंतर त्यातून हाेणाऱ्या कामाचे श्रेय मिळणार नसल्याची खंत हाेती. दुसरीकडे, कामे सुचवण्याचा अधिकार नसल्यामुळे याेजनेचा राजकीय फायदाही मिळणार नव्हता. ‘स्मार्ट सिटी’ला निधी दिल्यानंतर महापालिकेकडून नगरसेवक निधीला कात्री लागण्याची भीती असल्यामुळे ही याेजना महापालिकेच्या नियंत्रणाखाली राबवण्याची मागणी जाेर धरू लागली.

प्रारंभी भाजपचे पदाधिकारीही ‘स्मार्ट सिटी’ला विराेधाच्या मनस्थितीत हाेते, मात्र पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याच ‘ड्रीम प्राेजेक्ट’ला एकप्रकारे खाेडा घातला जात असल्याचे लक्षात येताच अखेरच्या टप्प्यात त्यांनी स्मार्ट सिटीसाठी दंड थाेपटले. लाेकांमध्ये जाऊन ‘स्मार्ट सिटी’ला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप अामदारांनी प्रयत्न सुरू केले. त्यातच पुणे मुंबई महापालिकेने अटी-शर्तीवर ‘एसपीव्ही’ला परवानगी दिल्यानंतर ताेच कित्ता गिरवून सत्ताधारी मनसेसह विराेधकांनी ‘स्मार्ट सिटी’ला हिरवा कंदील दाखवला. अाता याेजनेतून तूर्तास नाशिक बाद झाल्यानंतर जबाबदारीवरून राजकारण सुरू झाले अाहे. दरम्यान, याेजनेत नाशिकची नेमकी स्थिती समाेर अाली असून, महापालिकेला ३४ व्या क्रमांकावर स्थान मिळाले अाहे.

‘स्मार्ट सिटी’त वर्णी लागण्यासाठी नाशिक महापालिकेला अाता अाॅगस्टची वाट बघावी लागेल. त्यासाठी जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावा लागेल. दरम्यान, शुक्रवारी महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी नगरविकास विभागाचे सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांच्याशी चर्चा करून नाशिक नेमके काेठे कमी पडले याची माहिती घेतली. याचा तपशील लवकरच जाहीर करू, असे अायुक्त म्हणाले. अाता महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’तील काही अादर्श प्रस्तावांची माहिती घेण्याचे ठरवले असून, त्या अाधारावर नाशिकचा पुढील प्रस्ताव तयार हाेणार अाहे.

मुंबई, ठाण्यालाही नाशिक भारी
स्मार्ट सिटी याेजनेच्या पहिल्या यादीत राज्याचा विचार करता नागपूरनंतर नाशिक महापालिकेचा क्रमांक असून, गुणांकनानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डाेंबिवली या माेठ्या महापालिकांपेक्षा नाशिकला अधिक गुण मिळाले अाहेत.

दुसऱ्या फेरीसाठी जय्यत तयारी
^‘स्मार्टसिटी’त नाशिकचा दुसऱ्या फेरीत क्रमांक लावण्यासाठी महापालिका सर्वताेपरी प्रयत्न करेल. त्यासाठी अादर्श प्रस्तावांचा अभ्यास केला जाईल. अाॅगस्टमध्ये दुसऱ्या फेरीचे निकाल लागणे अपेक्षित अाहे. डाॅ. प्रवीण गेडाम, अायुक्त,महापालिका

असे अाहे महाराष्ट्रातील शहरांचे गुणांकन
शहर गुण
नागपूर ५३
नाशिक५२.७५
ठाणे५२.३४
कल्याण-डोंबिवली ५२.३०
नवी मुंबई ५१.३८
मुंबई महापालिका ५१.७७
अमरावती ४७.५७
अाैरंगाबाद ४५.७०