आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणगावच्या जवानाची आत्महत्या नव्हे घातपात, नाशिक जिल्ह्यातील पाटोळे कुटुंबीयांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - दिल्ली येथे देशसेवेत कार्यरत असलेले भारतीय लष्कराचे जवान सुनील रामचंद्र पाटोळे (३४) यांनी रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त खोटे असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. गुरुवारी पाटोळे यांच्यावर ठाणगाव या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी सुसाइड नोट पत्रकारांना प्रतिनिधींना दाखविली. त्यावर संशय व्यक्त करत ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला. संरक्षणमंत्र्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.  
 
पाटोळे यांनी बुधवारी दिल्ली येथे  गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लष्कारातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर बुधवारीच सुनीलचे वडील रामचंद्र पाटोळे, भाऊ शरद पाटोळे व मामा हे दिल्लीत पोहोचले. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील अक्षर सुनीलचे नसल्याचे त्यांचे म्हणणे  आहे. गेली चौदा वर्षे लष्करात सेवा बजावणाऱ्या सुनीलचे कुटुंबीयांशी कधीही कुठल्याही प्रकारचे भांडण नसताना तो असे टोकाचे पाऊल उचलणारच नाही, असे भाऊ शरदचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच सुनीलची सेवानिवृत्तीची वेळ झाली होती.  
बातम्या आणखी आहेत...