नाशिक - पाकिस्तानमधीलपेशावर येथे अतिरेक्यांनी लष्करी शाळेवर गोळीबार करून शेकडो निष्पापप विद्यार्थ्यांचा बळी घेतला. या अतिरेकी कारवाईचा निषेध म्हणून तसेच या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पापप विद्यार्थ्यांना शहरातील शाळांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
गंगापूररोडवरील बालविकास विद्यामंदिर येथील प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी शालेय कामकाज सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजली वाहिली. या वेळी मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, प्रमोद ठाकरे, लता देवरे, जयवंत पाळेकर, अर्चना ठाकरे, वर्षा ठाकरे, शोभा गायकवाड, प्रशांत मोगल आदींसह शिक्षक उपस्थित होते.
उर्दूशाळेत दुआ पठण
पेशावरघटनेत मृत्यूमूखी पडलेल्या निष्पाप बालकांसाठी जुन्या नाशकातील घासबाजार येथील भद्रकाली पोलिस ठाण्याजवळील रहेबर-ए-तालीम कमिटी संचलित रहेनुमा उर्दू शाळेत विशेष दुआ पठण करण्यात आले. तसेच या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका शिरीन सय्यद यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातपूरपरिसरातही कार्यक्रम
सातपूरविभागातील जनता विद्यालय ज्युनिअर कॉलेज, कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालय, अशोकनगर येथील मॉर्डन स्कूल, प्रगती विद्यालय, श्रमिकनगर येथील श्यामलाल गुप्ता हिंदी विद्यालय, शिवाजीनगर येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, पिंपळगांव बहुला येथील ज्योती विद्यालय अशा विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पेशावर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशलमीडियावरही निषेध
पेशावरघटनेच्या निषेधार्थ तसेच या हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्हाॅट्सअॅप, फेसबूक आदी सोशल मीडिया साइट्सवर दिवसभर संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती. विविध संदेश, चित्रांद्वारे या घटनेचा नेटसेव्हींनी निषेध केला