आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Sub Division Cancelled Suresh Wadkar's Complaint

सुरेश वाडकरांची नाशिक प्रांतांनी तक्रार फेटाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मदत व पुनर्वसन उपजिल्हाधिकारी आणि नाशिक प्रांत ही समकक्ष न्यायालये आहेत. त्यामुळे गायक सुरेश वाडकर यांच्या तक्रार अर्जावर मदत व पुनर्वसन उपजिल्हाधिकार्‍यांनी 15 डिसेंबर 2012 ला दिलेला निर्णय प्रांत विनय गोसावी यांनी कायम ठेवत वाडकर यांचे अपील फेटाळले आहे.

25 फेब्रुवारी 2008 रोजी मंजूर करण्यात आलेली देवळाली येथील फेरफार नोंद 21266 बाबत विनायक धोपावकर व इतर चार यांच्यातर्फे जनरल मुखत्यारपत्र तयार करून भूखंड परस्पर विक्री केल्याची तक्रार वाडकरांनी केली होती.

त्यावर 12 एप्रिलला सुनावणी झाली होती. त्यात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर उपजिल्हाधिकारी (मदत व पुनर्वसन) यांनी नोंद कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. तेच आदेश कायम करत नाशिक प्रांत यांनी अपील रद्दबातल ठरवले.

20 जून 2011 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्या आदेशानुसार तत्कालीन प्रांत नीलेश सागर यांच्याकडे असलेल्या अर्जांची संख्या पाहता ते विविध उपजिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणीसाठी विभागून देण्यात आले होते. त्यानुसार वाडकरांची तक्रार मदत व पुनर्वसन उपजिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आली. त्यावर त्यांनी सुनावणी दिली होती. त्यामुळे एकाच न्यायालयात एका तक्रारीच्या विरोधात दुसर्‍यांदा निकाल दिला जाऊ शकत नाही, असा मुद्दा राजेश दरगोडे व अजित दरगोडे यांचे वकील एस. एस. भगत यांनी उपस्थित केला.

त्यासाठी वरिष्ठ न्यायालयात ती तक्रार करणे अपेक्षित असल्याचेही एस. एस. भगत यांनी युक्तिवाद करताना म्हटले. त्यानुसार मंगळवारी देण्यात येणारा अंतिम निकाल तीन दिवस विलंबाने, म्हणजे गुरुवारी जाहीर करत वाडकरांचे अपील नाशिकच्या प्रांत कार्यालयाने फेटाळले आहे.