आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात रुग्णांवर ‘स्पेशल’ विघ्नाचे सावट; स्पेशालिटीतील तज्ज्ञ 16 पासून ‘रजेवर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील (सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल) तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रलंबित मागण्यांबाबत केलेल्या आंदोलनाला दोन महिने उलटूनही काहीच हालचाल न झाल्याने त्यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा स्वीकारत 16 सप्टेंबरपासून सामूहिक रजेवर जाण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात रुग्णांच्या शस्त्रक्रिया व तत्सम आरोग्यसेवेस खीळ बसणार आहे.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील हजारो रुग्ण दाखल होतात. तेथे सध्या कर्करोग, हृदयरोग आणि मूत्रपिंड विकाराशी निगडीत सर्वोच्च र्शेणीतील उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. अन्य कोणत्याही शासकीय रुग्णालयात होऊ न शकणार्‍या शस्त्रक्रिया या रुग्णालयात होत असल्याने सध्या दाखल झालेल्या रुग्णांनाही डॉक्टरांनी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनाचा फटका बसू शकतो.


समस्यांकडे दुर्लक्षामुळे डॉक्टर आक्रमक
रुग्णालयातील बीएएमएस, एमबीबीएस डॉक्टर आणि एमडी, एमएस या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पगारात कोणतीच तफावत नाही. तज्ज्ञ डॉक्टर म्हणून सेवा बजावूनही पगारात अपेक्षित वाढ होत नसल्याने त्यांनी आरोग्य विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र, त्याबाबत निर्णय घेण्यात चालढकलच केली जात असल्याच्या निषेधार्थ या तज्ज्ञ डॉक्टरांनी जूनच्या अखेरीस संपाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर स्थानिक आमदार वसंत गिते यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दीड महिना उलटूनदेखील समस्या सुटण्याच्या दृष्टीने काहीच झाले नसल्याने डॉक्टरांनी 16 सप्टेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची स्वतंत्र संघटना नसल्याने त्यांना संपाऐवजी ‘सामूहिक रजा’ आंदोलन पुकारावे लागले आहे.

शासनाची टोलवाटोलवी....वाचा, पुढील स्लाईड्‍सवर...