आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहराचा पारा 39 अंशांवर; दिवसा उकाडा, रात्री थंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराचे तपमान मंगळवारी 39 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद नाशिक हवामान केंद्रात करण्यात आली. तर, मालेगावला 42 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

नाशिक शहरातील पारा कमाल 39, तर किमान 14.6 अंश सेल्सिअसपर्यंतची नोंद करण्यात आली आहे. कमाल तपमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने चांगलाच उकाडा जाणवत आहे. दुपारी 2 ते 4 वाजेच्या सुमारास तपमानात वाढ झाली, तर सकाळी 7 वाजता किमान तपमानाची नोंद करण्यात आली आहे.सकाळी 10 वाजेपासूनच कडक ऊन जाणवत आहे. मात्र रात्री तपमानात घट होत असल्याने पहाटे थंडी जाणवत आहे.

दिवसा घराबाहेर निघताना महिलांसह पुरुषही चेहर्‍याची काळजी घेताना दिसत आहेत. डोक्याला ऊन लागू नये यासाठी पुरुष टोप्यांच्या तर महिला स्टोल, स्कार्पच्या वापरासह ब्लॅक, चॉकलेटी, ब्लू गॉगलचा वापर करताना दिसत आहेत.राज्यातील ठराविक भागात अधिक तपमान, तर काही भागात कमी यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहे. आद्र्रतेतही कमी-अधिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पावसाळा लवकर सुरू होईल, असा अंदाज आहे.