आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले. यामुळे मोठा गुन्हा घडता घडता टळला. टिप्पर गँगशी संबंधित असलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. न्यायालयाने त्यांना 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सोमवारी रात्री अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांना अंबड एमआयडीसीतील नाशिक कास्टिंग हाउस या बंद कंपनीजवळ एक टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तातडीने तपास यंत्रणा फिरवित पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा रचला.

अंबड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने या टोळीतील शाकीर नासीर पठाण (28), समाधान पितांबर तावडे (23, रा. उत्तमनगर), अनिल दशरथ पिठेकर (23), अण्णा नारायण काळे (24, रा. इंदिरा गांधी वसाहत) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन कोयते व मिरचीची पूड जमा करण्यात आली आहे. या कारवाईत अनिल दिघोळे, रियाज शेख, जगन्नाथ कसबे, छगन सोनवणे, उत्तम पवार, परमेश्वर दराडे, रमेश मानकर, दत्तात्रय पाळदे, मगर उगले, बाजीराव संगमनेरे, विवेक पाठक आदींनी विशेष कामगिरी केली.

आरोपी टिप्पर गँगशी संबंधित : या टोळीतील आरोपी हे सर्व टिप्पर गँगशी संबंधित असून, मुख्य आरोपी शाकीर पठाण हा मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या समीर पठाणचा भाऊ आहे. बाकीचे आरोपी हे वाहने चोरणे, घरफोड्या, चैन स्नॅचिंग आदीं गुन्हय़ांशी संबंधित असून, सराईत गुन्हेगार आहेत.

अपघातात एकाचा मृत्यू

महिरावणी येथे त्र्यंबकरोडवर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

जखमीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी 8.30 वाजेच्या सुमारास पिरबाबा मंदिराजवळ एका डंपरने नाशिकडून त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या दुचाकीस (एमएच 15 बीएच 224) धडक दिली. त्यात दुचाकीवरील तळेगाव (अंजनेरी) येथील रहिवासी देवराम रामचंद्र निंबेकर (55) यांचे जागीच निधन झाले, तर धोंडू बंडू टिळे हे गंभीर जखमी झाले आहेत. डंपर चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा तपास करीत आहेत.