आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik To Pune 40 Minutes, Sea Plane Service Starts

नाशिक ते पुणे ४० मिनिटांत, सी प्लेन सेवेचा प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाेझरच्या नव्या विमानतळाहून बहुप्रतीक्षित विमानसेवेला साेमवारी सुरुवात झाली. सकाळी १० वाजता मेहेर कंपनीच्या ‘सेसेना २०६ ’ या नऊ अासनी सी प्लेनने एचएएलच्या धावपट्टीवरून अाकाशात झेप घेतली. पहिल्या फेरीत पाच प्रवासी हाेते. पुण्यात पाेहाेचायला लागणारा सहा तासांचा वेळ चाळीस मिनिटांवर अाला अाहे.

नांदेड, शिर्डीतही लवकरच सेवा
मेहेर कंपनीने फ्लेक्सी टिकिटस‌् ही संकल्पना नाशिक-पुणे प्रवासाकरीता अंमलात अाणली. यात १०, २५ व ५० कुपन्स असून प्रत्येक कुपन्सची किंमत ४,९५० रू. असेल. कुपन्सधारकाला ते काेणालाही भेट देता येतील. मेहेर कंपनी लवकरच नांदेड, शिर्डीतही सेवा देईल.

एअरलाईन्स सेवा १३ जुलैपासून
श्रीनिवास एअरलाईन्स कंपनी अाेझरहून पुणे अाणि मुंबईकरीता १३ जुलैपासून सेवा सुरू करणार अाहे. सुरूवातीला सहा अासनी व नंतर सात अासनी विमान प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध हाेईल. नाशिक-पुण्याकरीता प्रती अासनी ४९९९ रूपये भाडे अाकारण्यात येईल.