आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या पर्यटकांची माळशेजला पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निसर्गाची मुक्त उधळण, धबधब्यांचा सांगावा, नभांच्या दाटीत लपाछपी खेळणारी फिरवाई अािण प्रसन्नतेची धुपछांव जेव्हा खुणावते तेव्हा या निसर्गाच्या स्वर्गसुखाला काेण पाठ फिरवेल. माळशेज घाटातील हे निसर्गसुख यंदा नािशकच्या पर्यटकांनी सर्वािधक अनुभवले. येथे येणाऱ्या एकूण पर्यटकांच्या संख्येच्या किमान २५ टक्के पर्यटक हे नािशकचेच असल्याची मािहती माळशेज येथील एमटीडीसीचे मॅनेजर किशाेर उगले यांनी दिली.
माळशेजपासून ७० किलाेमीटर अंतरावर असलेल्या माळीणमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे यंदा पर्यटकसंख्या राेडावली असली तरी पर्यटनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नसल्याचे अाताही घाटातील पर्यटक संख्येवरून दिसून येते. उन्हाळ्यात थंड वातावरण, थंडीत धुक्याची दुलई अािण पावसाळ्यात निसर्गाचा साजशृंगार अशा ितन्ही ऋतूत येथे पर्यटकांची गर्दी असल्याने येथे अाता त्या दृष्टीने विकासकामेही करण्यात येत अाहेत. विशेष म्हणजे या भागातही दरडी, डाेंगर काेसळण्याच्या लहान-माेठ्या घटना घडत असतात. त्यादृष्टीने अाता अनेक ठिकाणी सुरक्षा म्हणून संरक्षक जाळ्या लावण्यात अाल्या अाहेत. तर, घाटातून दरीच्या बाजूला सिंमेटच्या भिंती वा पूल उभारून संरक्षण करण्याचाही प्रयत्न हाेताना दिसताे अाहे.
माळशेज घाट हा मुंबई, पुणे, ठाणे, नािशक अािण नगर या जिल्ह्यांच्या मध्यावर येत असल्याने येथ पयर्टकांची गर्दी हाेते अाहे. त्यामुळे एमटीडीसीच्या रिसाॅर्टमध्ये अाता रूम्सची संख्या वाढविण्यात अाली अाहे. शिवाय येथे चिमुकल्यांसाठी विविध खेळ, सांस्कृितक कार्यक्रमांसाठी अॅम्फी थिएटरही बांधण्यात अाले अाहे. लवकरच एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटकांना या भागात बैलगाडीची सैर करायला मिळणार अाहे. याचा हेतू असा की, येथील स्थािनकांना शेतीव्यतिरिक्त राेजगार मिळेल अािण शहरातील पर्यटकांना बैलगाडीत फिरण्याचा अािण गावसंस्कृती अनुभवण्याचा अानंदही मिळेल.
माळीणचा फारसा परिणाम नाही
माळीण घटना फार माेठी हाेती. लाेकांना या भागात फिरायला यायला थाेडी धास्ती असायची. पण, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. उलट यावेळी माळशेज घाटात बऱ्याच सुधारणा केल्याने पर्यटक अानंदात हाेते. नािशकच्या पर्यटकांची संख्या त्यात जास्त हाेती. पाऊस उशिरा येवाे वा लवकर, येथील निसर्ग बाराही महिने खुणावतच असताे. - किशाेर उगले, व्यवस्थापक, एमटीडीसी, माळशेज