आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 ठिकाणी नाकेबंदी, विनाहेल्मेट हजार 951 चालकांवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त आणि वाहनचोरीचे वाढते प्रकार आणि हेल्मेटसक्ती कारवाईसाठी मंगळवारी (दि. १२) शहरात ५२ ठिकाणी नाकेबंदी करण्यात अाली. सकाळी ते रात्री वाजेपर्यंत सुरू असलेल्या या धडक कारवाईत विनाहेल्मेट हजार ९५१ वाहनचालकांवर केलेल्या कारवाईत १९ लाख ७५ हजार ५०० तर इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६५ केस मध्ये २२ लाख ४६ हजार ५०० रुपये इतका विक्रमी दंड वसूल करण्यात आला. 
 
बेशिस्त वाहनचालकांसह विनाहेल्मेट दुचाकीचालकांची संख्या वाढत आहे. वाहन चोरीचे प्रकारातही वाढ झाली अाहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी ५१ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती. वाहतूक विभाग आणि पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या संयुक्त धडक कारवाईत २० हजार वाहनांची तपासणी केली. कागपत्र नसणे, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रीपल सीट, भरधाव वाहन चालवणे, आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजार ३६५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत २२ लाख ४६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ३हजार ९५१ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाईत तब्बल १९ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला. कारवाई केलेल्यामध्ये सर्वाधिक टवाळखोर निदर्शनास अाले.. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अजय देवरे, डॉ. राजू भूजबळ, यांच्यासह वाहतूक पोलिस ठाण्याचे ४०० अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी होते. 

नाशिकरोडला ४८१ वाहनधारकांवर कारवाई; लाख ५३ हजार दंड वसूल 
पोलिसआयुक्तांच्या आदेशानुसार नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी नाकेबंदी करीत सुमारे ४८१ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून दाेन लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. 
 
नाशिकरोड परिसरात सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, बाजीराव महाजन यांनी शहरातील विनाहेल्मेट, विना कागदपत्रे, परवाना नसतानाही दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून जागोजागी नाकाबंदी करत कारवाई सुरू केली हाेती. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जेलरोड येथील दसक-पंचक चौक, नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा चौकात ३४६ वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख ६६ हजार ४०० रुपये दंड वसुल करण्यात आला. तर उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डीजीपीनगर, तपोवन मार्गावर १३५ वाहनधारकांवर कारवाई करून ७८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 
 
बॉडी वॉर्न कॅमेरांद्वारे चित्रीकरण 
कारवाई दरम्याण वाहनचालकांशी होणारे वादविवाद टाळण्यासाठी बॉडी वार्न कॅमेरा वापरण्यात आले. या धडक कारवाईत एक-दोन वादविवादाच्या घटना वगळता कारवाई शांततेत पार पडली. 
 
या पॉइंटवर सर्वाधिक कारवाई 
पाथर्डी फाटा, त्र्यंबकरोड, चोपडा लॉन्स, अंबड टी पॉइंट, पपया नर्सरी, जेहान सर्कल, औरंगाबादरोड, महामार्ग आदी ठिकाणी नाकेबंदीमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...