आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना लुटणार्‍या दोघांची धिंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - रात्रीच्या वेळी प्रवाशांची दिशाभूल करून त्यांची लूट करणार्‍या रिक्षाचालकांसह दोघांना देवळाली कॅम्प पोलिसांनी पकडले, तर यातील एकजण फरार झाला आहे. तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी या लुटारूंची देवळालीत धिंड काढून त्यांना चांगलाच चोप दिला.
याबाबत वृत्त असे की, रोजंदारी करून विठ्ठल मांगू राठोड व त्यांची पत्नी पुतळाबाई (रा. भीमनगर, शिंगवे बहुला) हे दांपत्य रात्री घरी परतण्यासाठी बिटको चौकातून रिक्षात (एमएच 15, वाय 4555) बसले. रिक्षाचालकाने धोंडीरोडऐवजी दुसर्‍याच मार्गाने रिक्षा शिंगवे बहुलाऐवजी लष्कराच्या हद्दीतील जंगलात पाळदे मळ्याजवळ नेली. या ठिकाणी दांपत्याला रिक्षातून बाहेर ओढून वरील तिघांनी दमदाटी सुरू केली व पुतळाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुबे व मोबाइल हिसकावून घेतले. या दांपत्याने लुटारूंच्या तावडीतून पळ काढला व अंधारातून मार्ग काढीत लष्कराच्या हद्दीत प्रवेश केला. लष्करी जवानांनी त्यांना भीमनगर येथे सोडले.
शुक्रवारी सकाळी या दांपत्याने घडलेला प्रकार पोलिस व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितला. पोलिसांनी शोध सुरू केला असता, या रिक्षाचालकाने रात्री देवळालीच्या गुप्ता पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्याची माहिती मिळाली.