Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Nashik Twelfth Standard Student Kills As Alto Car Hits At Adgaon Naka

नाशिक: भरधाव कारच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर

दिव्य मराठी वेब टीम | Mar 21, 2017, 06:50 AM IST

  • नाशिक: भरधाव कारच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर
नाशिक-भरधाव कारने दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. आडगाव नाक्यावरील स्वामी नारायण शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आज (सोमवारी) दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मनोज सुभाष बाविस्कर (19, रा. चव्हाणनगर, तपोवन) असे मृत तरूणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, मनोज आडगाव नाक्यावरील स्वामी नारायण शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील झाडाखाली उभा होता. तिच्यात भरधाव अल्टो कारने (एमएच 15- ईपी1377) मनोजला धडक दिली. मनोजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र विशाल पालवे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मनोजने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली होती. कारचालक राजश्री महाजन या महिलेविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी विशाल पालवे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended