आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकिपीडियावर नाशिकचे ‘अपडेशन’, एका क्लिकवर जिज्ञासूंना तपशीलवार माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एमआयटी कुंभथाॅनमध्ये विद्यार्थ्यांनी विकिपीडिया अपडेशन सुरू केले आहे. देश-परदेशातून येणाऱ्या भाविक-पर्यटकांना यामुळे नाशिकची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

यासाठी सुमारे सहा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांची टीम तयार करण्यात आली असून, ३० तारखेपर्यंत या प्रकल्पावर काम चालणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिकमध्ये असलेल्या पर्यटनस्थळांची माहिती देण्यात आली आहे. नाशिकच्या इतिहासाची नोंद सन १६१५ पासून करण्यात आलेली आहे. नाशिकचे नाव कसे पडले, यापासून नाशिकमध्ये येणाऱ्या नव्या सोयी-सुविधा यामध्ये आहेत. संबंधित ऑप्शन ओपन केल्यास काही मिनिटांपूर्वी झालेले अपडेट दिसतात. यावर काम करणारे विद्यार्थी विकिपीडियावर सातत्याने अपडेट करत असतात. अपडेट दिसणाऱ्या गोष्टींमध्ये नाशिकच्या ऐकीव कथा-आख्यायिका, पंचवटी, पर्यावरण, भूगोल, कुंभमेळा, हवामान, अर्थव्यवस्था, व्यवस्थापन, शैक्षणिक व्यवस्था दिसतात. त्याचबरोबर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, कुसुमाग्रज, अनंत कान्हेरे यांच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
या माहितीचे अपडेशन ३० जानेवारीपर्यंत आणि त्यानंतरही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली.