आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंडा मोर्चाचा दणका, जलवाहिनी मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अनियमित पाणीपुरवठय़ाच्या समस्येने त्रस्त झालेल्या वासननगर येथील पोलिस वसाहतीतील महिलांनी पालिकेच्या सिडको कार्यालयावर सोमवारी थेट हंडा मोर्चा काढला.

या मोर्चाच्या दणक्याने पालिका व विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी अनोखा तोडगा काढत तत्काळ नारळ फोडून जलवाहिनीच्या कामाचा र्शीगणेशा केला. गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा असतानाही ढिसाळ कारभारामुळे अनियमित पाणीपुरवठा होत आहे. तो सुरळीत करण्याच्या मागणीसाठी दुपारी 3 वाजता हा मोर्चा काढण्यात आला. विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाणके व पाणीपुरवठा अधिकारी अनिल रणशिंगणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असता, त्यांना घेराव घालत महिलांनी तक्रारींचा पाढा वाचला. आंदोलनात नगरसेविका वंदना बिरारी, शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुदाम डेमसे यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या.

टँकरने पाणी विकत घ्यावे लागते
अनेक दिवसांपासून वसाहतीत पाणीच येत नाही. तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे सध्या टँकरने पाणी विकत घेतले जात आहे. पोलिस वसाहतीला पाणी मिळत नसल्याने आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची? विमल आहेर