आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान आरक्षण लावा; शेतकर्‍यांनी केली तीव्र आंदोलनाची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- शहर विकास आराखड्यासाठी बागायत शेत जमिनीवरील आरक्षणाच्या विरोधात दसक, पंचक, चेहडी, सिन्नरफाटा, एकलहरे येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शहर परिसरात ठिकठिकाणी झालेल्या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला.

सिन्नरफाटा येथील देवळाली विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयात सिन्नरफाटा, एकलहरे परिसरातील शेतकर्‍याची बैठक अशोक खालकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आरखाड्यात किलरेस्कर फॅक्टरी परिसरातील सुमारे दोनशे एकर बागायती जमीन डी झोनसाठी आरक्षित केली असून, त्यास तीव्र विरोध करण्यात आला. यापूर्वी डी झोनसाठी आरक्षण केले असता तेथे आजपर्यंत विकास झाला नाही. अरिंगळे,भोर, मगर, खालकर, अस्वले आदी शेतकर्‍यांच्या जमिनींवर आरक्षण आहे. या बैठकीस केशव भोर, अरुण भोर, नगरसेवक हरिष भंडागे, कन्हैया साळवे, माजी नगरसेवक शिवाजी भागवत आदी उपस्थित होते.

दसकप्रमाणे पंचक शिवारात सावळागोंधळ उघड झाला. सव्र्हे नंबर 47 मध्ये वृंदावनच्या धर्तीवर उद्यानाचे आरक्षण असून, त्या लगतच्या गटात अंतिम ले-आउट मंजूर आहे. तेथे नागरिकांनी बंगले, इमारती बांधल्या असून पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे. पाच वर्षांपासून कराचा भरणा करत असलेल्या जागांवर आरक्षण टाकण्यात आले आहे. याच शिवारातील सव्र्हे नंबर 13 मध्ये 4 ते 5 एकरवर 1993 प्रमाणे दोन एकरवर अगोदरचे म्युन्सिपल शॉपिंग सेंटरचे आरक्षण होते. नवीन आराखड्यानुसार संपूर्ण 4 ते 5 एकर क्षेत्र आरक्षित केले आहे. याच ठिकाणी रहिवासी प्रकल्पाचे काम सुरू आहे.

एकवटले पाथर्डी पंचक्रोशितील ग्रामस्थ, शेतकरी
नाशिक- शहर विकास आराखड्याच्या विरोधात रविवारी पाथर्डी पंचक्रोशीतील पिंपळगाव खांब, दाढेगाव येथील शेतकर्‍यांनी पाथर्डीच्या हनुमान मंदिरात बैठक घेऊन आरक्षणाला विरोध दर्शविला.

ग्रीन झोनचा ‘यलो झोन’ करताना शेतकर्‍यांच्या जमिनींवर वेगवेगळी आरक्षणे टाकली. आरक्षणे टाकताना बिल्डरांच्या जमिनी वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या आराखड्याला विरोध करत पूर्वी होते तसेच ‘ग्रीन झोन’ राहू द्या, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली, तर पाथर्डीतील वाडीचे रान परिसरातील बागायती शेतींवर टाकण्यात आलेल्या उद्योग झोनला शेतकर्‍यांनी विरोध केला.

जमिनींचा सव्र्हे करून समान आरक्षण टाकावे, अशी मागणी सोमनाथ बोराडे, नगरसेवक शिवाजी चुंभळे, वंदना बिरारी, सुदाम कोंबडे, निवृत्ती गवळी, के. के. नवले, गणेश जाधव, संतोष बोराडे, प्रेमा बोराडे, बाळू बोराडे, बाकेराव डेमसे यांनी केली आहे.

दसक, पंचकला बैठक
दसक, पंचक परिसरातील शेतकरी, बांधकाम व्यावसायिकांची बैठक गटनेते अशोक सातभाई यांच्या उपस्थितीत झाली. आराखड्यात नवीन क्षेत्रात आरक्षण टाकणे आवश्यक असताना काही लोकांच्या हितार्थ नवीन क्षेत्राच्या विकास आराखड्यात समावेश केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. यावेळी मोहन आढाव, रुंझा लोखंडे, शिवाजी आढाव, राजेंद्र नागरे, दिनेश खांडरे, महेश पवार उपस्थित होते.

चेहडी शिवारात कचरा डेपो
चेहडी शिवारातील बाभळेश्वर रस्त्यावरील गट नंबर 84 ते 86 मध्ये 50 एकरात कचरा डेपोसाठी, तर सव्र्हे नंबर 111 मध्ये 25 एकरात नवीन फिल्टर प्लांटसाठी आरक्षण टाकले आहे. माजी नगरसेविका भारती ताजनपुरे यांच्या उपस्थितीत दत्तू ताजनपुरे, महादू ताजनपुरे, सुदाम बोराडे, आत्माराम पेखळे, अशोक ताजनपुरे, विलास बोराडे, विश्वनाथ ताजनपुरे, संदीप बोराडे या शेतकर्‍यांनी आंदोलनासह प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. चेहडीला सव्र्हे नंबर 84 ते 86 मध्ये मलनिस्सारण केंद्र उभारण्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना मिळालेला नाही. त्यावरच कचरा डेपो प्रकल्पासाठी पुन्हा आरक्षण टाकण्याचा डाव असल्याचा आरोप भारती ताजनपुरे यांनी केला.

जुन्या आराखड्यात ढवळाढवळ
2013 चा आराखडा तयार करताना 1993 च्या आराखड्यात ढवळाढवळ केली. पूर्वीपासूनचे रहिवासी क्षेत्र मैदान, बालोद्यान, शाळा, पार्किंग, शॉपिंग सेंटरचे आरक्षण टाकून काही मोठय़ा लोकांचे हित जोपसल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड यांनी यावेळी केला.