आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेल्फेअर कमिटीसाठी आज निवडणूक; दोन तुल्यबळ पॅनलमध्ये लढत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेसमधील वेल्फेअर फंड कमिटीच्या 18 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. नोट प्रेसमधील सात, सिक्युरिटी प्रेसमधील आठ, कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या 2 व चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांच्या एक अशा 18 जागांसाठी सत्ताधारी कामगार व प्रतिस्पर्धी आपला पॅनलमध्ये दुरंगी लढत होईल.

नोट प्रेसमध्ये तीन हजार, तर सिक्युरिटी प्रेसमध्ये साडेतीन हजार असे साडेसहा हजार मतदार आहेत. कामगार पॅनलचे नेतृत्व ज्ञानेश्वर जुंद्रे, जगदीश गोडसे व आपला पॅनलचे नेतृत्व रामभाऊ जगताप, अशोक गायधनी करीत आहेत.

‘कामगार’ व ‘आपला’चे उमेदवार
करन्सी नोट प्रेस : कामगार पॅनल- सतीश चंद्रमोरे, मुरलीधर जगताप, बाळासाहेब ढेरिंगे, मच्छिंद्र जाधव, तुळशिराम पाटोळे, आण्णा सोनवणे, सुभाष चव्हाण; आपला पॅनल- हिरामण तेजोळे, सुनील ढगे, सुरेश मुत्रक, मधुकर तुंगार, हेमंत काफरे, कचरू ताजनपुरे, अनिल पांडे.

इंडिया सिक्युरिटी प्रेस : कामगार पॅनल- बळवंत आरोटे, अशोक तुकाराम अहिरे, चंद्रकांत सापरखेडे, मनीष कोकाटे, दत्तात्रय पैठणकर, ज्ञानेश्वर गायकवाड, भीमा साळवे, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे; आपला पॅनल- रघुनाथ वाणी, सतीश निकम, राजू पवार, योगेश जाधव, संजय बोराडे, गोकुळ काकड, भूषण मेढे, किरण गांगुर्डे.

कार्यालयीन कर्मचारी - सुरेश बोराडे, शेखर पगारे, सुंभरा.

चतुर्थ र्शेणी कर्मचारी - शांताराम पाळदे, अनिल बोराडे.