आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकातील श्रेयवादानंतर पाणीकपात रद्द;

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूर धरणातील पुरेसा पाणीसाठा व मनसेतील श्रेयवादानंतर अखेर महापौर अँड. यतिन वाघ यांनी सोमवारी प्रशासनाच्या साक्षीने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी दोन वेळा पाणी मिळणार्‍या भागातही एकच वेळ पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेचा मनोदय असला तरी त्याला विरोधकांनी विरोध केला आहे.

धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने फेब्रुवारीत आठवड्यात एक दिवस पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वपक्षीय गटनेत्यांनी त्यास विरोध केला. यामुळे महापौरांसह आयुक्त संजय खंदारे यांनी निर्णयात फेरबदल करत रोज 15 ते 20 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. मार्चपासून ही कपात नाशिककरांना सहन करावी लागली. जून व जुलैत चांगला पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठा वाढला. यामुळे कपात तत्काळ मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शहर विकास आघाडीचे गटनेते गुरुमित बग्गा तसेच स्थायीच्या सदस्यांनीही सभेत केली. प्रशासनाने त्याप्रमाणे तयारी केली मात्र, महापौर बाहेरगावी असल्याने प्रशासनाला. हा निर्णय घेता आला नाही.

र्शेयवादाची लढाई : पाणी कपात रद्द करण्याच्या र्शेयावरून मनसेतील पदाधिकार्‍यांत चढाओढ असल्याचे चित्र दिसले आहे. महापौर बाहेरगावी असताना स्थायीचे सभापती रमेश धोंगडे यांनी परस्पर पाणीकपात रद्दचे आदेश प्रशासनाला देत महापौरांच्या वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला.

एकवाक्यता ठेवा
नाशिककरांच्या हक्काच्या पाण्यावर पुरेसा साठा असूनही गदा आणण्याचा प्रयत्न मनसेकडून होत आहे. र्शेयवादामुळे महापौर, स्थायीचे सभापती व आमदार वेगवेगळे निर्णय घेत आहेत. त्यांनी एकवाक्यता ठेवून निर्णय घ्यावा.
-अजय बोरस्ते, गटनेते, शिवसेना

पूर्वीप्रमाणेच वेळ
पाणीकपात रद्द झालेली असली तरी सहाही विभागातील पुरवठय़ाच्या वेळेत बदल केलेला नाही. कपात रद्द झाल्यामुळे आता 20 मिनिटे ते अर्धा तास इतका जादा वेळ पुरवठा होईल.
- आर. के. पवार, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा