आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीगळती रोखण्यासाठी पालिकेचा एसएमएस फंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्यामुळे महापालिका प्रशासनाने पाण्याची गळती थांबवण्यासाठी पावले उचलली असून शहरात कोठेही पाणीगळती आढळल्यास सहाही विभागातील उपअभियंत्यांना दूरध्वनी व एसएमएस करण्याचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला असून जवळपास दहा टक्के पाणीकपातीचा प्रस्तावही पालिकेच्या विचाराधीन आहे. एकीकडे पाणीकपातीची तयारी केली जात असताना दुसरीकडे पाणीगळती रोखण्यासाठी मात्र महापालिका उपाययोजना करीत नसल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आता नागरिकांची मदत घेऊन जलवाहिनीतील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उपअभियंत्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकच पालिकेने प्रसिद्ध केले असून संबधित विभागातील अधिका-यांशी संपर्क साधून पाणीगळती थांबवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
शहराला जुलैपर्यंत पुरेल इतका पाणसाठी गंगापूर धरणात असल्याची ग्वाही दिली जात असतानाच दुसरीकडे महापालिकेतर्फे पर्यायी व्यवस्थाही करण्यात येत आहे.
विभागनिहाय संपर्क अधिकारी
> नाशिक पूर्व : यू. डी. सोनवणे : 9423171147, व्ही. डी. माडीवाले : 9423171196
> नाशिक पश्चिम : जी. डी. मैंद : 9423179179, एन. जे. वाडिले : 9323179197
> पंचवटी : आर. एम. शिंदे : 8275022769, एम. एच. मोमीन : 9423179208
> नाशिकरोड : एन. के. पाटील : 9422222843, आर. एम. ठाकरे : 9423179184
> सिडको : ए. एस नरसिंगे : 9422222803, जी. पी. पगारे : 9423179181
> सातपूर : एस. एस. आडेसरा : 9423179183
राजीव गांधी भवन (नियंत्रण कक्ष ): 145 किंवा 2573704