नाशिक - मराठवाड्याला साेडलेल्या पाण्यामुळे इतिहासात प्रथमच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या नाशिककरांचे ताेंडचे पाणी पावसाची अाेढ अशीच कायम राहिल्यास जुलै महिन्यात पळण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. दारणा धरणातील १३० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूरमधून देण्याबाबत पालिकेच्या प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने अनभिज्ञता दर्शवली असून, दुसरीकडे जून जुलैत फारशी कृपादृष्टी दाखवण्याचा पावसाचा अनुभव लक्षात घेता ही तूट काेठून भरायची, असा गहन प्रश्न निर्माण हाेणार अाहे. या सर्वात २० जुलैच्या अासपासच पाणी अारक्षण संपुष्टात येण्याची भीतीही निर्माण झाली अाहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूमिकेमुळे भाजपबराेबरच अाता पालकमंत्र्यांचीही अडचण वाढणार अाहे.
मराठवाड्याला पाणी साेडल्यामुळे नाशिक शहराला ३० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत अाहे. विशेष म्हणजे, पाणी साेडण्यावरून निर्माण झालेला वाद विसरून नाशिककरांनी साेशिकता दाखवत कपातीचा मनापासून स्वीकार केला. मात्र, येत्या काळात पाऊस लांबला तर पुन्हा नाशिककरांच्या सहनशीलतेची परीक्षा हाेणार अाहे. सद्यस्थितीत दारणा धरणातील पाणीपुरवठा बंद झाला असून, शेजारील खेडे, सिन्नर अाैद्याेगिक वसाहत अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या दारणातून नाशिक महापालिकेला पाणी मिळणे बंद झाले अाहे. सद्यस्थितीत मंजूर अारक्षणाप्रमाणे ३३०, तर पालिकेच्या हिशेबानुसार १३० दशलक्ष घनफूट पाणी दारणातून येणे अपेक्षित अाहे. पालिकेने दारणातून ३०० दशलक्ष घनफूट, तर जिल्हा प्रशासनाने ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचा हिशेब गृहीत धरला हाेता. यापैकी १७० दशलक्ष घनफूटच पाणी पालिकेने उचलले अाहे. थाेडक्यात दारणा धरणातील १३० दशलक्ष घनफूट पाणी पालिकेला मिळणे अपेक्षित असून, या पाण्यावर पालिकेचा ३१ जुलैपर्यंत शहराला ३० टक्के कपात करून पाणी पुरवण्याचे नियाेजन अाहे. अाता दारणातील पाणी गंगापूर धरणातून मिळाल्यास प्रतिदिन १० दशलक्ष घनफूट याप्रमाणे १३ दिवसांचे पाणी अापसूकच कमी हाेणार अाहे. म्हणजेच ३१ मधून १३ कमी झाल्यावर साधारण १८ इतका उरणारा अाकडा लक्षात घेत ताेपर्यंतच पाणी पुरेल, असा पालिकेचा अाडाखा अाहे. त्यादृष्टीने गंगापूरमधून १३० दशलक्ष घनफूट वाढीव पाणी मिळण्याची मागणी अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी ताेंडी केली त्यास त्यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही ताेंडी तत्त्वता हाेकार दर्शवला हाेता. मात्र, वाढीव पाणी मिळण्याची नाशिकच्यादृष्टीने सकारात्मक बाब समाेर अाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तांत्रिक बाबी पुढे करून अशी काेणतीही मान्यताच नसल्याचे सांगितल्यामुळे नवीन वादाला ताेंड फुटण्याची चिन्हे अाहेत.
अशी हाेईल अडचण : जिल्हाप्रशासनाने संबंधित पाण्याची तूट गंगापूर धरणातून भरून दिल्यास तेरा दिवसांचे पाणी काेठून अाणायचे, असा प्रश्न निर्माण हाेईल. दरम्यानच्या काळात पाऊस झाला तर ठीक, अन्यथा मागील जून जुलैत कमी हाेणाऱ्या पर्जन्यमानाचा अनुभव लक्षात घेता त्याचा थेट फटका नाशिककरांना बसू शकताे. सद्यस्थितीत जूनचा दुसरा अाठवडा संपण्याची वेळ अाली तरी पाऊस झालेला नाही. याउलट उकाडा वाढला असून, त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग लक्षात घेत पाण्याचा साठा झपाट्याने कमी हाेऊ शकताे. अशा परिस्थितीत पाण्याची तूट भरून काढण्यासाठी तांत्रिक बाबीचे कारण पुढे करण्याच्या दाेन्ही यंत्रणांमधील वादाचा नाशिककरांना फटका बसू शकताे.
पालकमंत्र्यांची वाढणार डाेकेदुखी : सरकारीकामकाजात कागदाला प्रचंड महत्त्व असते. त्यामुळेच दारणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी गंगापूरमधून पाणी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी अावश्यक अाहे. मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर भाजपवर खासकरून पालकमंत्र्यांवर सर्वच राजकीय पक्षांकडून चांगलाच हल्लाबाेल झाला हाेता. दरम्यान, अाता दारणातील पाण्याची तूट गंगापूरमधून भरून काढण्यावरून दाेन यंत्रणांमध्ये सुरू झालेला वाद पालकमंत्र्यांची डाेेकेदुखी वाढवणारा ठरण्याची भीती अाहे. दारणातून गंगापूरमध्ये पाणी देणे म्हणजे अारक्षण बदलण्याचा प्रकार असून, त्यासाठी पालकमंत्र्यांचीच मंजुरी अावश्यक असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जात अाहे. दुर्दैवाने पालकमंत्र्यांची तशी मंजुरी नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने एकप्रकारे त्यांचे या गंभीर बाबीकडे लक्ष नाही असेही अधाेरेखित करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, अशीही शंका येते. दुसरीकडे दारणातील पाणी बंद झाल्यामुळे पालिकेला गंगापूरमधून पाणी द्यावे लागेल, ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमंत्र्यांची का लक्षात अाणून दिली नाही? लक्षात अाणून दिली तर त्यांनी तत्परतेने का कारवाई केली नाही, असे असंख्य प्रश्न येत्या काळात पाऊस झाल्यास तापण्याची शक्यता अाहे.
अाढावा घेऊन ठरवणार
^तूर्तास पाण्याचाकाेणताही प्रश्न नाही. पावसाने पुढे अाेढ दिल्यास काय करायचे, याचे नियाेजन लवकरच हाेईल. सध्या माझ्याकडे पाणीसाठ्याचे अाकडे नसल्यामुळे अाताच काही सांगता येणार नाही. -डाॅ. प्रवीण गेडाम, अायुक्त, महापालिका