आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वर्षांत ‘मुकणे’ भागवणार नाशिककरांची पाण्याची तहान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहराची वाढती लोकसंख्या शासनाकडून पिण्याच्या पाण्याचे दिवसेंदिवस कमी होत असलेलेे आरक्षण लक्षात घेऊन महापालिकेने बांधलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे शहरात पाणी आणण्याच्या योजनेला प्रारंभ केला असून, त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामांनाही सुरुवात झाली अाहे. या योजनेमुळे मुकणे धरणातून २०१८ पर्यंत लाख, तर २०३१ पर्यंत ३० लाख लोकांना पाणी पुरविण्याचे नियोजन करण्यात आहे. १४ जानेवारी २०१६ पासून सुरू असलेले हे काम १३ जुलै २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे.
शहराला गंगापूर, कश्यपी, गौतमी धरणसमूह दारणा धरण यातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, झपाट्याने वाढणारी शहराची लोकसंख्या बघता या पाण्याचे हे आरक्षण कमी पडत असल्याचे अलीकडच्या काळात कमी पाऊस झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच शासन पालिकेने मुकणे किकवी धरणाचा पर्याय शोधत बांधणी सुरू केली आहे. सन २०४१ ची शहराची लोकसंख्या गृहीत धरून या दोन धरणांतील पाण्याचे नियाेजन करण्यास प्रारंभ करण्यात अाला अाहे. यंदा राज्यात दुष्काळाचे दिसलेले चित्र नाशिक शहरातही दिसून आले. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने राज्य शासनाकडे नवीन मुकणे धरण पाणीपुरवठा योजना राबविण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या योजनेस राज्य शासनाने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत मंजुरी दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. यात जॅकवेल पंप हाऊस बांधण्याची कामे सुरू आहेत. या जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी तीन पातळ्यांवर गेट बसविण्यात येणार आहेत. जॅकवेलवर पंप हाऊस बंाधून त्यात १६ पंप बसविण्यात येणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १३७ दशलक्ष लिटर क्षमतेसाठी पंप बसविण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात धरणात २३० मीटर लांबीचा अप्रोच चॅनल खोदण्यात येणार आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात जॅकवेलपासून धरणाच्या भिंतीपर्यंत अवागमन करण्यासाठी तसेच जलवाहिनी टाकण्यासाठी १० मीटर रुंदीचा २५० मीटर लांबीचा अप्रोच ब्रीज बांधण्यात येणार आहे.

या भागाला फायदा
विल्होळी नाका येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रातून पाइपलाइन पाथर्डी फाटा येथे आणली जाणार असून, याद्वारे नवीन नाशिक, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वाडीचे रान, इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, दीपालीनगर तसेच द्वारकापर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल.

सन २०३१ पर्यंतचे नियोजन..
^शहराची लोकसंख्या बघता या धरणसमूहातील पाण्याचे आरक्षण कमी पडणार असल्याने सन २०४१ची शहराची लोकसंख्या गृहीत धरून मुकणे धरण पाणीपुरवठा योजना राबविण्याची कामे तीन टप्प्यांत केली जाणार आहेत. धरणात जॅकवेलआणि विल्होळी नाका जलशुद्धीकरण केंद्राची कामे सुरू आहेत. यात २०१८ पर्यंत लाख लोकांना पाणी देण्याचे, तर २०३१ पर्यंत ३० लाख लोकांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आहे. यू.बी. पवार, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

‘जलशुद्धीकरण’चे काम सुरू
पहिल्या टप्प्यात सन २०१८ पर्यंत धरणातील पाणी उचलले जाणार आहे. यासाठी मुकणे धरणातून १८ किलोमीटर थेट पाइपलाइनद्वारे महामार्गाच्या एकाच बाजूने विल्होळी नाका येथील ट्रकटर्मिनसजवळील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे. मुकणे धरणात सुरू असलेल्या जॅकवेलच्या कामांबरोबर विल्होळी नाका येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्राचेही काम सुरू करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...