आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Wholesale Business Man Band Against Panan

आडत दुकानदारांचा बेमुदत बंद, पणन संचालकांच्या आडत वसुलीच्या आदेशाला विराेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी आडत ही आता खरेदीदारांकडून करण्यात यावी, असा आदेश पणन संचालक डाॅ. सुभाष माने यांनी दिला आहे. या निर्णयामुळे फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी राज्यभरातील आडतदार आणि व्यापारी वर्गाने मात्र या निर्णयाला तीव्र विराेध केला आहे. ‘जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय नाशिकसह राज्यभरातील आडतदार यांनी घेतला. तसेच साेमवारपासून शहरातील आडत बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे.
दुसरीकडे, या निर्णयाविरोधात आडकाठी आणण्याचे काम केले तर सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
विक्री केलेल्या शेतमालावर शेतकऱ्यांकडून आडतदार एकूण रकमेवर चार टक्के आडत घेत होते. मात्र, ही आडत आणि तोलाई ही कायमस्वरूपी बंद व्हावी, म्हणून शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जात होती. युती सरकारने शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी आडत रद्द करून ती खरेदीदारांकडून घेण्यात यावी, असा आदेश नुकताच बजावला आहे. त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, असे आदेशही पणन संचालक डाॅ. सुभाष माने यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना दिले आहे. मात्र, आडतदार संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे.
रवविारी पिंपळगाव येथे आडतदार आणि व्यापारी यांनी बैठक घेऊन जोपर्यंत शासन हा आदेश रद्द करीत नाही तोपर्यंत कांदा, भाजीपाला, बटाटा, बेदाणा, टोमॅटो लिलाव बेमुदत बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा बाजार समित्यांमधील लिलाव बंद होणार आहे.
शेतकरी आनंदी
आडत्याचे चार टक्के कमशनि शेतकऱ्यांच्या पैशांतून घेतले जात होते. परंतु, बहुतांश बाजार समित्यांमध्ये आडतदार हेच व्यापारी आहे. त्यामुळे आडतदारांना शेतकऱ्यांच्या माध्यमातून जी आडत मिळायची, ती पूर्णपणे बंद झाल्याने आडतदार संतापले आहेत. परंतु, शेतकऱ्यांसाठी हा निर्णय हितदायक ठरला असल्याने कांदा, भाजीपाला, टोमॅटो उत्पादक आनंदी आहेत.
भाजीपाल्यांचे दर वाढण्याची शक्यता
‘लिलाव बंद’चा शेतकऱ्यांना फटका
सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये आडतदार व्यापाऱ्यांनी बेमुदत लिलाव बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे लिलाव न झाल्यास शहरातील किरकोळ बाजारात भाजीपाला पोहोचण्यास उशीर होणार असल्याने भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
शेतकरी संघटनांचा बंदला विराेध
आडकाठी आणल्यास आंदोलन
^
तोलाई आणि आडत बंद करून शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे जास्त येणार आहेत. कोणी आडकाठी आणली तर तीव्र आंदोलन करू.
- हंसराज वडघुले, स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या मागे शुक्लकाष्ट
^
कांद्याला सध्या चांगला दर मिळत असताना व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा इशारा दिल्याने पुन्हा शेतकरी हवालदिल होणार आहे. हा राज्यस्तरीय निर्णय आहे. आम्ही स्थानिक व्यापाऱ्यांना सकारात्मक निर्णय घेण्याची वनिंती केली आहे.
नानासाहेब पाटील, सभापती, लासलगाव बाजार समिती
शासन जबाबदार
^
शासनाच्या निर्णयाविरोधात आम्ही बेमुदत लिलाव बंद आंदोलन करीत आहोत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील.
अनिल बूब, व्यापारी प्रतनििधी
निर्णय रद्द करावा
^
शेतकऱ्यांकडून आडत घेणे बंद केल्याने शेतकऱ्यांच्या पैशांना सुरक्षा राहणार नाही. शासनाचा हा निर्णय चुकीचा असून, तो त्वरित रद्द करावा.
अतुल शहा, संचालक, पिंपळगाव बाजार समिती