आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकची वाइन आता ड्रॅगनला घालणार भुरळ, ‘पॉज वाइन’ नवीन आर्थिक वर्षात चीनच्या बाजारपेठेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साता समुद्रापार पोहोचलेली नाशिकची वाइन अाता ड्रॅगनला भुरळ घालणार आहे. नाशिकमध्ये निर्मिती हाेत असलेली पाॅज वाइन येत्या अार्थिक वर्षापासून चीनच्या बाजारपेठेत उतरणार असून, तेथे उपलब्ध भारतातील माेजक्याच वाइन ब्रॅण्डमध्ये नाशिकच्याही वाइनचा समावेश हाेणार अाहे.
यानिमित्ताने नाशिकच्या वाइनला एक नवी बाजारपेठही उपलब्ध हाेणार अाहे. पाॅज वाइन्सचे चेअरमन अाणि व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी याबाबतची घाेषणा शनिवारी गाेव्यात पणजी येथे नवीन उत्पादनांच्या सादरीकरणप्रसंगी केली.अाम्ही विविध देशांना वाइन सॅम्पल्स िदलेले असून, त्यापैकी अधिकाधिक वाइन चीनमध्ये िवक्री करणार असल्याचे पाटील यांनी सांिगतले. चीनमध्ये वाइनचा खप दरडाेई जास्त असल्याने ती अामच्यासाठी एक उत्तम बाजारपेठ आहे. तेथील बाजारपेठ भारतापेक्षा दहापट माेठी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. युराेपियन देशांशीही अामची चर्चा सुरू असून, तेथे माेठ्या संख्येने राहत असलेल्या भारतीयांकडून वाइनची अधिक मागणी असल्याने अामच्यासाठी युराेपियन देश हीदेखील माेठी बाजारपेठ अाहे. पाॅज वाइन्सने २००५ मध्ये नाशिकमध्ये अापली सुरुवात केली असून, दीडशे एकरवर िवनियार्ड असून, एक लाख लिटर वाइनची निर्मिती केली जाते. नवीन बाजारपेठेत प्रवेश करतानाच एक लाख लिटर अतिरिक्त उत्पादन अामची वायनरी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. नाशिकमध्ये अातापर्यंत ३५ ते ४० काेटी रुपयांची गुंतवणूक अाम्ही केलेली असून, अतिरिक्त एक लाख लिटर वाइनची िनर्मिती करण्यासाठी सात ते अाठ काेटी रुपये गुंतविले जाणार अाहेत. त्यापैकी दाेन ते तीन काेटी रुपये मार्केटिंग प्लॅनसाठी खर्च केले जाणार असल्याचे पाटील म्हणाले.
कंपनी गाेवा, कर्नाटक अाणि महाराष्ट्रातील वायनरीज््शी संलग्न असून, या ितन्ही राज्यांत अामची उत्पादने उपलब्ध अाहेत. चालू वर्षात अाम्ही राजस्थान, अाग्रा येथे भागीदारी केली असून, विदेशी पर्यटक अाणि उच्चभ्रू वर्गासाठी अाम्ही लाेकप्रिय पर्यटनस्थळांकडे लक्ष केंद्रित केले असून, विस्ताराबाबत कंपनी गांभीर्याने विचार करीत असल्याचे पाटील यांनी सांिगतले.

नाशिकची वाइन ड्रॅगनला घालणार अाता भुरळ
अाम्हीविविध देशांना वाइन सॅम्पल्स िदलेले असून, त्यापैकी अधिकाधिक वाइन चीनमध्ये िवक्री करणार असल्याचे पाटील यांनी सांिगतले. चीनमध्ये वाइनचा खप दरडाेई जास्त असल्याने ती अामच्यासाठी एक उत्तम बाजारपेठ आहे. तेथील बाजारपेठ भारतापेक्षा दहापट माेठी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. युराेपियन देशांशीही अामची चर्चा सुरू असून, तेथे माेठ्या संख्येने राहत असलेल्या भारतीयांकडून वाइनची अधिक मागणी असल्याने अामच्यासाठी युराेपियन देश हीदेखील माेठी बाजारपेठ अाहे. पाॅज वाइन्सने २००५ मध्ये नाशिकमध्ये अापली सुरुवात केली असून, दीडशे एकरवर िवनियार्ड असून, एक लाख लिटर वाइनची निर्मिती केली जाते. नवीन बाजारपेठेत प्रवेश करतानाच एक लाख लिटर अतिरिक्त उत्पादन अामची वायनरी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. नाशिकमध्ये अातापर्यंत ३५ ते ४० काेटी रुपयांची गुंतवणूक अाम्ही केलेली असून, अतिरिक्त एक लाख लिटर वाइनची िनर्मिती करण्यासाठी सात ते अाठ काेटी रुपये गुंतविले जाणार अाहेत. त्यापैकी दाेन ते तीन काेटी रुपये मार्केटिंग प्लॅनसाठी खर्च केले जाणार असल्याचे पाटील म्हणाले.
कंपनी गाेवा, कर्नाटक अाणि महाराष्ट्रातील वायनरीज््शी संलग्न असून, या ितन्ही राज्यांत अामची उत्पादने उपलब्ध अाहेत. चालू वर्षात अाम्ही राजस्थान, अाग्रा येथे भागीदारी केली असून, विदेशी पर्यटक अाणि उच्चभ्रू वर्गासाठी अाम्ही लाेकप्रिय पर्यटनस्थळांकडे लक्ष केंद्रित केले असून, विस्ताराबाबत कंपनी गांभीर्याने विचार करीत असल्याचे पाटील यांनी सांिगतले.

दिंडाेरीत होते वाइनची निर्मिती
पाॅजवाइन्सचा दिंडाेरीतील ए. डी. वायनरीशी करार असून, त्यांनी िनर्मित केलेल्या िकमान दीड लाख लिटर वाइनचा पुरवठा पाॅज वाइन्सला केला जाताे, अशी माहिती ए. डी. वायनरीजचे संचालक सुरेश देशमुख यांनी दिली.