आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विल्होळीतील देशी दारू दुकाने बंद करा; महिलांचा आक्रमक पवित्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विल्होळी परिसरात दारूबंदी करावी या मागणीचे निवेदन महिलानी ग्रामपंचायत सरपंचांना दिले. यावेळी कुसूम डहाळे, इंदुबाई मधे, ताराबाई चारसकर, मंदाबाई शिंदे आदी. - Divya Marathi
विल्होळी परिसरात दारूबंदी करावी या मागणीचे निवेदन महिलानी ग्रामपंचायत सरपंचांना दिले. यावेळी कुसूम डहाळे, इंदुबाई मधे, ताराबाई चारसकर, मंदाबाई शिंदे आदी.
सिडको: विल्होळी येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील देशी दारू दुकाने बंद करावीत, शिवाय सर्वप्रकारचे मद्य व्यवसाय बंद व्हावेत यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून याबाबत ग्रामपंचायत पोलिसांना निवदेन दिले आहे. याबाबत कारवाई केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. 
 
याबाबत महिलांनी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मांडला होता. मात्र त्यानंतरही अवैध दारूविक्री सुरू असल्याने या महिलांनी सरपंच, तालुका पोलिस ठाणे यांना दारूबंदीबाबत निवेदन दिले होते. त्यानंतरही पोलिस लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. मद्यापींचा त्रास सुरूच असून गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय परिसरातील वातावरण बिघडले असून शांतता भंग होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुसूम डहाळे, इंदुबाई मधे, ताराबाई चारसकर, मंदाबाई शिंदे, अहिल्याबाई वाघ, कौसाबाई आचारी, ताराबाई बेंडकुळी, सुमनबाई गाडेकर, मीराबाई निंबेकर, म्हाळसाबाई आव्हाड, संगीत मधे, मीराबाई वाघ, सोनाली निबेकर, गोद्याबाई आचारी, पार्वताबाई निगळे, छबूबाई गांगुर्डे, छबूबाई भावनाथ आदींसह महिलांनी विल्होळी गाव परिसरात 100 टक्के दारूबंदीची मागणी केली आहे.
 
नियमांची पायमल्ली सुरूच 
महामार्गापासून ५०० मीटरवर मद्य विक्री करू नये अशी नियमावली बनविण्यात आली आहे. याची अनेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, विल्होळी गाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक ठिकाणी हॉटेलवर सर्रासपणे मद्यविक्री केली जाते. काही ठिकाणी बाहेरून मद्य आणून जेवण करताना पिण्यास परवानगी दिली जाते आहे. हे सर्व प्रकार तालुका पोलिसांच्या छुप्या पाठिंब्याने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व प्रकाराची पोलिस आयुक्तांनी दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 
 
महिलांच्या निवेदनांनंतरही कारवाई नाही 
दारूबंदीबाबत महिलांनी ग्रामपंचायत तालुका पोलिसांना रितसर निवेदन दिले आहे. याबाबत महिनाभरानंतरही कारवाई केली गेली नाही. म्हणजेच या सर्व प्रकाराला पोलिस प्रशासनाचा छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. तर अनेक ठिकाणी हॉटेल दारूच्या अड्ड्यांवर काही पोलिसांचा आर्थिक सहभाग असून, त्यामुळेच सर्वच प्रकारचे अवैध धंदे जोरात राजरोसपणे सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून याबाबत आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. ​
बातम्या आणखी आहेत...