आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या योग प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील यांचा 103 तास विश्वविक्रमी याेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- नाशिकच्या योग प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सलग १०३ तास योगासने करण्याचा विश्वविक्रम रचला. अांतरराष्ट्रीय याेगदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी या विक्रमाची नोंद गिनीज बुकात नोंद झाली आहे. ‘गिनीज’च्या प्रतिनिधीच्या हस्ते प्रज्ञा पाटील यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 
 
नाशिक येथील योग प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी इगतपुरी येथे सलग १०३ तास म्यारेथॉन योगा करून एक नविन एक विश्वविक्रम केला असून, याची नोंद ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये घेतली गेली आहे.यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा एक तुरा रोवला गेला आहे.ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्यानंतर प्रज्ञा पाटील यांच्या नातेवाईकांनी व मित्र मैत्रिणीनी एकच जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
 
आधीचा विक्रम ५७ तास 
इगतपुरीत १६ जूनला पहाटे ४.३० ला प्रज्ञांनी याेगास प्रारंभ केला. तामिळनाडूच्या के.पी. रचना यांच्या नावावरील ५७ तासांचा विक्रम त्यांनी १८ जूनला मोडला. नव्या विक्रमासाठी त्यांनी योगा करणे सुरूच ठेवले. मंगळवारी दुपारी ११.४५ वाजता १०३ तासांचा नवा विश्वविक्रम नोंदवला. 
 
या आसनांद्वारे विक्रम : सर्वांगासन, हलासन, विस्तृत पाद हलासन, वज्रासन, सुप्र वज्रासन, भुजंगासन, द्विपाद उत्तान पादासन, पद्मासन, सुप्र पद्मासन, शवासन, मकरासन, मर्कटासन
 
हे ही वाचा,  
बातम्या आणखी आहेत...