आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक कलाकारांना यूट्यूबचे व्यासपीठ, नाशिकमध्येच तयार झालेल्या अल्बम्सना मिळाले हजारो हिट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्लॅमरच्या दुनियेतील संघर्ष हा मुंबईत जाऊनच करावा लागताे. अर्थात, इतका संघर्ष करूनही त्यातून यश मिळेलच याची शाश्वती नसते. ही बाब अाेळखून नाशिकचे काही तरुण एकत्र अाले अाणि त्यांनी गाण्यांचे अल्बम्स स्वत:च तयार करून यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली. या अल्बम्सला चांगल्या हिट्सही मिळत अाहेत. त्यातून चांगल्या संधी उपलब्ध हाेण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.
बीवायके महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग घेतल्यानंतर हर्षद कुलकर्णीला ही कल्पना सुचली. त्याने अापल्या मित्रांना ही संकल्पना सांगितली. त्यानुसार, पहिल्यांदा त्यांनी ‘बीवायके अॅन्थम’ तयार केले. ते काही दिवसांतच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अाेठांवर रुळले. त्यानंतर व्हिडिअाे साँग निर्मितीला सुरुवात झाली.
गाण्यातील नायक अाणि नायिकेसाठी व्हाॅट‌्सअॅपवरून अर्ज मागविण्यात अाले. अर्ज करणारेही नाशिकचेच हाेते. त्यामुळे त्यांनाही चांगले व्यासपीठ उपलब्ध हाेणार हाेते. ग्रुपमधील मित्रांनी अापला पाॅकेटमनी अन्य कामासाठी खर्च करता ताे चित्रीकरणासाठी केला. त्यातून भाडेतत्त्वावर छाेटेखानी कॅमेरा अाणण्यात अाला.
हर्षदने चित्रफितीचे प्रमाेशन व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली. अविनाश तिवारीने गीत सादर केले. सुभाेजित डे याने गाणे लिहिले अाणि कंपाेज केले. अादित्य बंग रिचा शहा यांनी चित्रीकरणाची, तर मनीष माेहरीर यांनी एडिटिंगची जबाबदारी पार पाडली. यानंतर तयार झालेल्या ‘राेया मेरा मन’ या गाण्याला काही दिवसांत तब्बल दहा हजार हिट्स मिळाल्या. त्यानंतरच्या ‘देखाे ना सनम’ या गाण्याला हजाराच्यावर हिट‌्स मिळाल्या अाहेत. एच. के. एन्टरटेंनमेंट या नावाने हे गाणे प्रसिद्ध झाले. या क्लिप्स http://youtu.be/mjhuzDHs83MHK या लिंकवर बघायला मिळतील.

शाॅर्टफिल्मचे काम सध्या सुरू
चांगले प्रायाेजक मिळाले तर अाम्ही यापेक्षाही चांगले काम करून दाखवू शकताे. सध्या अाम्ही उपलब्ध सामग्रीवरच चित्रीकरण करीत अाहाेत. शाॅर्टफिल्मचे कामही सध्या सुरू अाहे. हर्षद कुलकर्णी, ग्रुपचा सदस्य