आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुरळ आगळ्या हेअर स्टाइलची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - परीक्षांचा काळ संपल्याने युवकांमध्ये आकर्षक दिसण्यासाठी पेहरावासोबत आकर्षक हेअर स्टाइल करण्याकडे कल वाढला आहे. यासाठी हेअर स्टाइलबाबत सोमवारी महाकवी कालिदास कला मंदिरात झालेल्या मार्गदर्शन शिबिरात ड्रॅगन, पर्ल, हनी सिंग, वेस्टर्नाइज, आर्मी, मशरूम, ग्रास या प्रकारच्या हेअर स्टाइलचे प्रात्यक्षिक विविध कलाकारांनी दाखविले.

राज्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराचा लाभ मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक येथील तरुणांनी घेतला. या वेळी झालेल्या स्पर्धेत 50 स्पर्धक सहभागी होते. त्यातून नाशिकच्या भूषण वाघ यांच्या हेअर स्टाइलला प्रथम क्रमांक मिळाला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सलुन असोशिएशन, मुक्त विद्यापीठ आणि प्रसन्न सलुन अकॅडमीतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अभिनेते प्रशांत पाटील, अभिषेक कसोदे, नाभिक महामंडळाचे अध्यक्ष भगवान बिडवे, सुभाष बिडवई, दिलीप जाधव, नारायण यादव, संजय वाघ, संतोष वाघ, विवेक आहिरे आदी या वेळी उपस्थित होते.
छायाचित्र - ड्रॅगन स्टाइल.