आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी नाशिककर... मला शांतता हवी... साेशल मीडियावरही अभियान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील सामाजिक सलाेखा अाणि शांतता टिकून राहण्यासाठी काही तरुणांनी पुढे येत ‘मी नाशिककर.. मला शांतता हवी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली अाहे. यात शांततेचे संदेश हाेर्डिंग अाणि स्टिकरद्वारे पाेहाेचविण्यात येणार अाहेत.
तळेगाव येथील घटनेनंतर शहरातील तणाव वाढला अाहे. काही दिवसांपूर्वी ठिकठिकाणी वाहने जाळण्यात अाली हाेती. तसेच, दगडफेकही झाली हाेती. साेशल मीडियाने विशेषत: व्हाॅट‌्सअॅपने त्यात तेल अाेतण्याचे काम केल्याने माेठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात अाल्या. त्यामुळे शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण हाेऊन पाेलिसांसमाेर माेठे अाव्हान निर्माण झाले. अफवांना राेखण्यासाठी पाेलिस विभागाकडून माेबाइल इंटरनेट अाणि बल्क संदेश बंद करण्यात अाले. त्याचा चांगला परिणाम दिसून अाला. मात्र, काही गटांमध्ये हाणामाऱ्या सुरूच हाेत्या. त्यामुळे घराबाहेर पडतानाही नाशिककरांना चार वेळा विचार करावा लागत अाहे. सर्वांमध्येच असुरक्षिततेची भावना असल्याने घराबाहेर पडण्यापूर्वी अन्य कुणाला माेबाइलवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती घेतली जात अाहे. या असुरक्षिततेच्या वातावरणातून नाशिककरांना बाहेर काढण्यासाठी काॅलेजराेडच्या काही तरुणांनी ‘मी नाशिककर.. मला शांतता हवी’ हे अभियान सुरू केले अाहे. यात माैखिक जागृतीबराेबरच विविध ठिकाणी हाेर्डिंग लावून तसेच स्टिकरचे वाटप करून शांततेचे अावाहन केले जात अाहे. नाशिकचे वातावरण असेच तापते राहिले तर त्यात सर्वाधिक नुकसान सर्वसामान्यांचेच अाहे, ही बाब यातून पटवून देण्यात येणार अाहे. या अभियानासाठी भूषण मटकरी, भूषणकाळे, डाॅ. शैलेंद्र गायकवाड, उत्कर्ष बेदमुथा, परेश मेहता अादी तरुण प्रयत्नशील अाहेत.
इंटरनेट सुरू झाल्यावर व्हाॅट‌्सअॅप अाणि फेसबुकद्वारे ‘मी नाशिककर...’ संकल्पना सर्वदूर पाेहाेचविली जाणार अाहे. जातीय दंगली करून काेणाचेही भले झाले नाही, असा संदेश यावरून दिला जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...