आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या तरुणाईची ‘यू ट्यूब’वर शॉर्टफिल्म्सद्वारे दमदार कलाकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बाॅलीवूडमध्ये संधी मिळत नसल्याने अनेक कलाकारांना मन मारून दुसऱ्या क्षेत्रात काम करावे लागते. नाशिकच्या तरुणाईने यातून चांगला मार्ग काढला असून, स्वत:चेच गाणे वा शाॅर्टफिल्म तयार करून यू ट्यूबवर अपलाेड केले जाते. त्याचा फायदा त्यांचे प्राेफाईल भक्कम हाेण्यासाठी हाेत अाहेच; शिवाय या माध्यमातून नाशिकचेही ब्रॅण्डिंग हाेत अाहे. नाशिकचे बहुसंख्य कलाकार चंदेरी दुनिया अर्थात मुंबईत नशीब अाजमावतात. यात काही गुणवत्तेच्या जाेरावर, तर काही वैयक्तिक संबंधांच्या जाेरावर मायानगरीत स्थिरावतात. बहुसंख्य कलाकारांच्या नशिबी केवळ संघर्षच असताे. गुणवत्ता असतानाही केवळ वशिला नाही म्हणून त्यांना संधी मिळत नाही. मात्र, यामुळे केवळ हातावर हात धरून बसता नाशिकच्या तरुणाईने स्वत:चे अल्बम, गाणी वा लघुपट काढण्याची शक्कल लढविली अाहे. यू ट्यूबवर अाज नाशिकच्या कलाकारांच्या असंख्य क्लिप्स अपलाेड करण्यात अाल्या असून, त्याला असंख्य लाइक्स व्ह्यूव्हजदेखील मिळत अाहे.
ड्रेपरीतून सामाजिक संदेश
साैंदर्य निर्मिती संस्थेने ‘ड्रेपरी’ लघुपटाची निर्मिती केली अाहे. संकल्पना दिग्दर्शन डाॅ. चैतन्य बागुल यांची अाहे. लघुपटाची लांबी मिनिटांइतकी असून, यात एका मंडळाचे दाेन बेबंद अध्यक्ष खजिनदार अाहेत. जे गणपती विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन धांगडधिंगा करतात.
विसर्जनानंतर हे दाेन्ही हाेस्टेलवर परतात. तेथे त्यांचा सामना हाेताे लाेकमान्य टिळकांशी. त्यानंतर टिळक दाेघांची कानउघाडणी करतात. लाेकमान्यांची भूमिका अादिल शेख यांची असून, पटकथा संकलनही त्यांचेच अाहे. डाॅ. बागुल, विशाल राऊत यांच्याही भूमिका अाहेत. संगीताची बाजू मयुर हिरे चित्रीकरणाची बाजू जितेंद्र साेनार यांनी सांभाळली अाहे.

युवकांनी काढला लघुपट
नाशिकराेडच्या युवकांनी ७० हजारांची वर्गणी करून नाशिकमधील रावडी अॅक्शन शाॅर्टफिल्म तयार केली. यू ट्यूबवर अपलाेड केल्यावर पहिल्याच दिवशी तिला एक हजार हिट्स मिळाल्या. ही फिल्म पुणे, गाेवा अादी फेस्टिव्हलसाठी पाठविण्यात येणार अाहे. नाशिकराेड, एकलहरा, गांधीनगर, जेलराेड, पंचवटी येथे या चित्रपटाचे शूटिंग झाले अाहे. निर्माता दिग्दर्शक अाकाश बागुल, अायुशी साेनवणे, अाकाश गायकवाड, करण उघाडे, रूपेश कदम, दीपक गाेडसे, प्रणव मते, अमन ठाकूर, सूरज ठाकूर, सूरज कागडा, पंकज पाटील, नीलेश राऊत, अशरफ शेख, प्रतीक अास्तुरे, साेमेश्वर वर्मा, ललित कदम यांनी भूमिका केल्या अाहेत.

‘श्वास तुझा’त फाइव्ह डीचा वापर
फाइव्हडी’ तंत्रज्ञानाचा-कॅमेऱ्याचा वापर करून काही तरुणांनी ‘श्वास तुझा’ हे गाणे नुकतेच चित्रित करून यू ट्यूबवर अपलाेड केले अाहे. एका रात्रीत १५०० व्ह्यूव्हज मिळाले. नाशिकमधील हे पहिले व्यावसायिक पातळीवरचे गाणे असल्याचा दावा कार्यकारी निर्माता नीलेश चव्हाण यांनी केला अाहे. गाण्याचे दिग्दर्शक सुमित कांबळे, छायांकन प्रल्हाद राैंदळ, गीतकार अजिंक्य पादुल, गायक गाैरव पवार यांनी अापापल्या जबाबदाऱ्या चाेखपणे पार पाडल्या असून, गाैरव पवार, प्रियंका हिरे, सचिन घाेडेकर, नीलेश चव्हाण यांनी यात भूमिका केली अाहे. या अल्बमसाठी राैनक गुप्ता अाणि अतुल यांचे सहकार्य लाभले अाहे.

‘स्वप्नात तू’ च्या यशानंतर संगीतकार गौरव - आशिष यांचे ‘बातें जरुरी नही’ हे नवीन गीत यू ट्यूबवर प्रदर्शित झाले अाहे. या गीताला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. स्वप्नात तू, पावसाच्या पाकळ्यांनी, तुला पाहिले, शांत कल्लोळ अशा अनेक मराठी गीतांच्या निर्मितीनंतर संगीतकार गौरव - आशिष यांच्या पहिल्यावहिल्या हिंदी गीताचे सगळीकडून काैतुक होत आहे. या गीताचे शब्द आणि संगीत गौरव - आशिष यांचे असून, आशिष शुक्ल यांनी हे गीत गायले आहे. खऱ्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते...या संकल्पनेवर आधारित हे गीत आहे. गौरव - आशिष यांच्या या आधीच्या गीताला यूट्यूबवर ५० हजारांहून जास्त हिट्स मिळाल्या आहेत. सध्या मराठी चित्रपट आणि अल्बम यावर त्यांचे काम सुरू असून, या वर्षअखेरीस त्यांचे नवीन गीत प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
बातम्या आणखी आहेत...