आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वॅलाेरेड २०१६’ शर्यतीमध्ये नाशिकच्या युवकांची बाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ठाण्यापासून प्रारंभ झालेल्या ‘वॅलाेरेड २०१६’ स्पर्धेमध्ये नाशिकच्या अरुण भाेये, अनिकेत साेनवणे, हिरामण अाहेर, भरत साेनवणे, राकेश प्रवरा, रामचंद्र गावित यांच्या टीमने बाजी मारून वॅलाेरेड २०१६ ही शर्यत जिंकली. १८० किलाेमीटरची ही शर्यत नाशिकच्या टीमने तास ४५ मिनिटात पूर्ण करून पुन्हा एकदा वॅलाेरेडवर नाशिकचा ठसा उमटवला. स्पर्धेनंतर रात्री उशिरा चषक अाणि राेख पुरस्कार देऊन विजेत्यांना गाैरविण्यात अाले.
या स्पर्धेचा मार्ग ठाणे ते अाटगाव ते वैतरणा ते खर्डी अाणि परत ठाणे असा १८० किलाेमीटरचा हाेता. नाशिकच्या या सायकलपटूंनी प्रारंभापासूनच अाघाडी घेत ती अखेरपर्यंत कायम राखली. ही अाघाडी अखेरपर्यंत कायम राखत संपूर्ण अंतर तास ४५ मिनिटात पूर्ण केले. नाशिकच्या संघाचा कर्णधार म्हणून अनिकेत साेनवणे याने, तर व्यवस्थापक म्हणून जसपालसिंग अाणि किशाेर काळे यांनी काम पाहिले. यापूर्वीदेखील नाशिकच्या संघाने वेलाेरेड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले अाहे.

अादिवासी पट्ट्यातील युवक
याशर्यतीचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेले बहुतांश युवक हे जिल्ह्याच्या अादिवासी पट्ट्यातील अाहेत. त्यांनी शर्यतीत सहभागी हाेण्यासाठी खूप अाधीपासून तयारी सुरु केली हाेती. नाशिकपासून थेट ठाण्यापर्यंत जाऊन स्पर्धेसाठी सराव केला जात हाेता. त्यांच्या या यशाबद्दल नाशिक सायकलिस्ट संघटनेच्या वतीनेदेखील त्यांचे अभिनंदन करण्यात अाले. तसेच नाशकात परतल्यानंतर या सायकलपटूंचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात येणार अाहे.


बातम्या आणखी आहेत...