नाशिक - २४लाख रुपयांच्या विकासकामांच्या फायली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाने परस्पर घरी नेल्याच्या तक्रारीवरून सोमवारी जबरदस्त राडा झाला. जिल्हा परिषद मुख्यालयात या प्रकरणावरून सुरुवातीला आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर अश्लील शिवीगाळ करत उपाध्यक्ष स्वीय सहाय्यकाने सर्वच मर्यादा बाजूला ठेवत थेट एकमेकांवर चालून जाण्याचा प्रयत्न केला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी दोघांना आवरल्यानंतर हा वाद मिटला.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी कडक पावले उचलत फायली परस्पर घरी नेण्याच्या प्रकारावर कारवाई सुरू केली अाहे. जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यात अडीच वर्षांत प्रचंड बेबनाव झाला. अध्यक्षांकडून फायली अडवल्या जातात, असा अाराेप करीत दाेन िदवसांपूर्वी शासकीय कन्या शाळेच्या कार्यक्रमावरही सकाळे यांनी बहिष्कार टाकला होता.
साेमवारी उपाध्यक्षांनी अापल्या त्र्यंबक मतदारसंघातील िवकासकामांच्या फायली मंजूर का होत नाही, अशी विचारणा बांधकाम िवभागक्रमांक चे कार्यकारी अभियंता िवष्णू पालवे यांना केली. मात्र, त्यांनी या फायली अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक जे. पी. खैरनार यांनी नेल्याचे सांगितले. त्यावरून भडकलेल्या उपाध्यक्षांनी प्रशासकीय मान्यता झालेल्या अापल्या फायलीमध्ये हस्तक्षेप कशासाठी, असा सवाल करत खैरनार यांना फाेन लावला. मात्र त्यांनी ताे उचलला नाही. नेमके उपाध्यक्ष बांधकाम िवभागातून बाहेर पडत असताना खैरनार समाेर अाले. त्यानंतर दाेघांमध्ये फायलीवरून अाराेप- प्रत्याराेप सुरू झाले. त्यानंतर हा वाद इतका चिघळला की प्रकरण हातापाईपर्यंत गेले. लाेकप्रतिनिधीचा अवमान होत असल्याचा कर्मचाऱ्याला िवसर पडला लाेकप्रतिनिधींनीही स्वत:ची मर्यादा अाेलांडत िशवीगाळ केली. दरम्यान, उपाध्यक्षांविराेधात पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी कर्मचाऱ्यावर दबाव टाकल्याचेही वृत्त होते.
फायलीघरी नेण्याबाबत चाैकशी
फायलीपरस्पर घरी नेण्याच्या प्रकाराची बनकर यांनी चाैकशी सुरू केली. प्राथमिक चाैकशीत फायली घरी नेल्या नसल्याचे समाेर अाले. खैरनार यांनी कामांचे रजिस्टर अध्यक्ष कार्यालयात नेले. यात उपाध्यक्षांनी काेणती िकती रकमेची कामे केली याचा तपशील होता.
चाैकशीचे अादेश
^उपाध्यक्षकर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या कथित वादाची चाैकशी करण्याचे अादेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (प्रशासन) िदले अाहेत. फायली घरी नेल्याचा अाराेप प्रथमदर्शनी चुकीचा वाटताे. उपाध्यक्षांनी केलेल्या कामाचे रजिस्टर मात्र नेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सुखदेवबनकर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद