आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककराने साकारली ‘विश्वशांती’तील 21 शिल्पे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माईर्स एमआयटी, विश्वशांती केंद्रातर्फे पुण्याजवळील लोणी काळभोर येथे दिवंगत अभिनेते राजकपूर यांच्या स्मरणार्थ राजबाग उभारण्यात आली असून, यातील विश्वशांती संगीत कला अकादमीचे उद्घाटन अकादमीच्या अध्यक्षा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 11) होणार आहे. या अकादमीतील 21 शिल्पे आणि काही म्युरल्स नाशिकचे शिल्पकार दिलीप रोहम यांनी साकारली आहेत.

म्युरल्स म्हणजे उठावदार शिल्प. सप्तस्वरांची प्रतिके असणार्‍या सात घुमटाकार वास्तू आणि त्या मधोमध नादब्रह्मा चे प्रतीक असणारी अत्यंत देखणी वास्तू हे या कला अकादमीचे वैशिष्ट्य असल्याचे रोहम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे नादब्रह्मा या वास्तुतील नारदमुनींचे भगवान कृष्ण यांच्या दरबारातील आगमन या प्रसंगाचे म्युरल्स साकारण्याचे अत्यंत कठीण काम रोहम यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. त्याचबरोबर याच सात घुमटाकार वास्तूमध्ये कृष्णाच्या बासरी वादनाने चित्त हरपलेल्या गोपिका असे आणखी एक म्युरल्स तयार करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. संगीत अकादमीद्वारे संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांना संगीत शास्त्राचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. लोणी काळभोर येथील राजबाग येथे अभिनेता राजकपूर यांची समाधी आहे. येथील 130 एकरपैकी तीन एकर जागेमध्ये विविध प्रकारचे शिल्प उभारले जात असून, विश्वशांती संगीत कला अकादमी याच ठिकाणी साकारली जात आहे.

राजबागेत साकारले 21 शिल्प
गेल्या 20 वर्षांपासून रोहम या कलेशी निगडित आहेत. सातपूरमध्ये त्यांचा दिलीप रोहम आर्ट अकादमी हा स्टुडिओ आहे. राजबाग आणि विश्वशांती संगीत अकादमीत त्यांनी विविध प्रकारचे 21 शिल्प आणि म्युरल्समध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक येथेच जीडी आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केलेल्या रोहम यांनी प्रख्यात शिल्पकार राम आनंद थत्ते यांच्याकडेही कलेचे धडे गिरविले. त्यांनी राजकपूर मेमोरियल बागेत राजकपूर, प्राण, देवआनंद, ललिता पवार, दादा कोंडके, निळू फुले, पंडित नेहरू, भारतभूषण, वसंत शिंदे, प्रेमनाथ, डिंपल कपाडिया, सुलोचना, मोहंमद रफी, दिलीप कुमार, शत्रुघ्न सिन्हा आदी मान्यवरांची हुबेहूब शिल्प साकारली आहेत. म्युरल्स आणि बस्ट (अर्धपुतळा) अशा दोन प्रकारात शिल्प साकारले जाते. श्ॉडो मातीत तयार केलेले शिल्प फायबर किंवा मेटलमध्ये तयार केले जाते.

श्रीरामपूरला मदर तेरेसांचे शिल्प
श्रीरामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून दिलीप रोहम यांनी मदर तेरेसा यांचा पूर्णाकृती पुतळा साकारला असून, महाराष्ट्रातील तो एकमेव पुतळा ठरणार आहे. वाहतूक बेटामध्ये हा पुतळा राहाणार असून, त्यास कला संचालनालयानेही परवानगी दिल्याची माहिती रोहम यांनी दिली.

अमूर्त शिल्प साकारायचेय
रोहम यांना अमूर्त शिल्प (अँबस्ट्रॅक) साकारायचे आहे. आजपर्यंत त्यांनी दीड हजार विविध शिल्प नाशिक, कोल्हापूर, नगर, श्रीरामपूर, मुंबई आणि गुजरातमध्ये साकारली आहेत. एखाद्या व्यक्तिमत्त्वाला हुबेहूब ओळख निर्माण करून देणे ही शिल्पकलेत अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. येशू ख्रिस्तांच्या जीवनावर आधारित 14 म्युरल्सची सिरीज तयार केली असून, पुणे आणि गोवा येथे ही म्युरल्स लोकार्पण केली आहेत. दिलीप रोहम, शिल्पकार