आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांचा मूर्ती संकलनात नवा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लाडक्या गणरायाला निराेप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने एकूण ५९ ठिकाणी व्यवस्था करून अाराेग्य अाणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती करण्यात अाली हाेती. त्यातदेखील नदीचे पावित्र्य राखण्यासाठी ३० जागांवर कृत्रिम तळी उभारून त्यातदेखील विसर्जनाची व्यवस्था करण्यात अाली हाेती. या जागांवर जाऊन अनेक भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले. त्यापेक्षा कैकपटीने अधिक भाविकांनी गाेदावरीच्या घाटांवर ठिकठिकाणी उभ्या असलेल्या विविध संस्थांच्या, संघटनांच्या मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती दान करण्यास प्राधान्य दिले. ‘गणपती बाप्पा माेरया... पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत यंदा बहुतांश नागरिकांसह निम्म्याहून अधिक मंडळांची पावले मूर्ती संकलन केंद्राकडे वळत हाेती. गेल्या सहा वर्षांतील अाकडेवारी पाहिली असता, दरवर्षी मूर्ती दान करण्याचा अाकडा वाढतच गेला असल्याचे दिसून येते.

विद्यार्थी परिषदेचाही पुढाकार
अखिलभारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने घाटावर विविध ठिकाणी उभारण्यात अालेल्या मूर्ती संकलन केंद्राला अाबालवृद्धांनी मोठया संख्येने गणेशमूर्ती दान करीत प्रतिसाद दिला. फुटांपेक्षा जास्त उंचीच्या विविध मंडळाच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती या वेळी दान करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमातून हजार मूर्तींचे संकलन करण्यात अाले. त्यात के. के. वाघ, संदीप इंजिनिअरिंग, स्वप्नपूर्ती फाउंडेशन, शीतल अकॅडमी, जल्लाेष ग्रुप, व्ही. एन. नाईक काॅलेज, एचपीटी काॅलेज, केटीएचएम काॅलेज, पंचवटी काॅलेज , भाेसला काॅलेज, बिटकाे काॅलेज, एनबीटी लाॅ काॅलेज तसेच अारंभ महिला महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. या सर्व मूर्ती महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात अाल्या.

युनिक फाउंडेशनलाही प्रतिसाद
इंदिरानगर,किशोरनगर, राजीवनगर येथे युनिक ग्रुपच्या वतीने पाच हजारांपेक्षा जास्त गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. या ठिकाणी दहा दिवसांपासून गणेशोत्सवांतर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जनाच्या दिवशी नगरसेवक सतीश सोनवणे यांनी पर्यावरण रक्षणासाठी भाविकांना गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केलेे. राजीवनगर मैदानावर राबवलेल्या या मूर्ती दान उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद लाभला. या सर्व मूर्ती संकलित करून महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. ग्रुपच्या सदस्यांनी भाविकांचे स्वागत केले. या वेळी संतोष कुलकर्णी, किशोर सिरसाठ, सुधीर बिडवई, अमित शार्दुल, रंगनाथ जाधव, अनिकेत सोनवणे आदींसह ग्रुपचे सर्व सदस्य माेठ्या संख्येने उपस्थित होते.

१९ वर्षांपूर्वी केवळ १०२ मूर्ती संकलित
१९ वर्षापूर्वी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने मूर्ती दान करा’ हा उपक्रम प्रथमच राबविला हाेता. पहिल्या वर्षी केवळ १०२ मूर्ती संकलित झाल्या. नंतर सामाजिक संघटना अाणि संस्थांनी उपक्रमात सहभाग नाेंदवित मूर्ती संकलनाची संख्या अडीच लाखांच्याही वर नेली.
मुर्ती
२७,०१५ :२००९
११,५००:२०१०
४२,५७०:२०११
१,१२,०००:२०१२
१,४०,५४१:२०१३
२,६२,१९२:२०१४
२,७१,३८६:२०१५

गंगापूर धबधबा येथे नगरसेवक विलास शिंदे यांच्या मुर्ती संकलन केंद्रास पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी भेट देवून मुर्ती संकलनात सहभाग नाेंदविला. या वेळी ११ हजार माेदकांचे वाटप करण्यात अाले. पालकमंत्र्यांनी या उपक्रमाचे काैतुक केले.

विभागनिहाय दान करण्यात अालेल्या मूर्ती निर्माल्य
पूर्व : ९,७२५३.२ टन
पश्चिम: २६,९४९३.७ टन
पंचवटी: १,४५,०००३५ टन
सिडकाे: ६४,२६१२३. टन
सातपूर: २०,०७७१९.४ टन
ना.राेड: २३,७२०११ .६ टन