आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकराेड’वरून रेल्वे साेडणे शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- रेल्वेस्थानकावर टर्मिनस उभारणीच्या मागणीचा प्रस्ताव लालफितीत अडकलेला असला तरी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नव्याने उभारलेल्या चाैथ्या प्लॅटफाॅर्मवर गाडीच्या देखभालीची व्यवस्था करण्यात अाल्याने कुंभमेळ्यानंतर नाशिकराेड स्थानकावर गाडी मुक्कामी ठेवून साेडणे शक्य हाेणार अाहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या साेयीसाठी मध्य रेल्वेने ठिकठिकाणावरून १५ लांब पल्ल्याच्या १५ स्पेशल गाड्या साेडण्याचे नियाेजन केले अाहे. त्यापैकी भुसावळ-नाशिकराेड, हावडा-नाशिकराेड, इगतपुरी-अाेढा-इगतपुरी या गाड्या सुरू करण्यात अाल्या अाहेत. सिंहस्थाच्या निमित्ताने साेडण्यात येणाऱ्या गाड्या चाैथ्या प्लॅटफाॅर्मवर थांबवून प्लॅटफाॅर्म एकवरून साेडल्या जाणार अाहेत. या गाड्यांचा शेवटचा थांबा नाशिकराेड असल्याने गाड्यांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था प्लॅटफाॅर्म चारवर करण्यात अाली अाहे. त्यासाठी रेल्वे रुळालगत कायमस्वरूपी पाईपलाईन टाकण्यात अाली असून, प्रत्येक काेचमध्ये पाणी भरण्यासाठी पाईपची व्यवस्था अाहे. या व्यवस्थेमुळे अाता गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी इगतपुरी अथवा भुसावळला जाण्याची अावश्यकता भासणार नाही.

नाशिकराेड स्थानकावर रेल्वे टर्मिनसची नाशिककरांची मागणी अनेक वर्षे जुनी असून, रेल्वे प्रशासनाने अार्थिक कारणास्तव तिला केराची टाेपली दाखवली अाहे. मात्र, अाता कुंभमेळ्याच्या निमित्ताने देखभाल व्यवस्था झाली असून, वीज जागाही उपलब्ध असल्याने भविष्यात नाशिकराेडवरून गाडी साेडणे शक्य असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कुंभमेळ्यानिमित्त उभारलेल्या चाैथ्या प्लॅटफाॅर्मवर देखभालीची व्यवस्था
सुविधा

५७ हजार लिटर पाणी भरणे शक्य
नाशिकराेडस्थानकावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ लाख लिटर पाण्याचे अारक्षण करण्यात अाले अाहे. गाडीच्या प्रत्येक काेचमध्ये महापालिकेचे शुद्ध पाणी भरले जाणार अाहे. एका काेचमध्ये २४०० लिटर याप्रमाणे २४ काेचच्या गाडीत ५७ हजार ६०० लिटर पाणी भरणे शक्य हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...