आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वच्छ भारत अभियानात देशात नाशिकरोड रेल्वेस्थानक सातवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान सुरू केले होते. या अभियानांतर्गत देशातील ४०७ रेल्वे स्थानकांमधून नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा स्वच्छतेमध्ये सातवा क्रमांक लागला आहे. तर मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, सोलापूर, मुंबई आणि पुणे या विभागातील एकमेव स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून नाशिकरोडचा क्रमांक लागला आहे. त्याचप्रमाणे वर्षभर सातत्याने स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून प्रवाशांच्या ओठीही स्तुती ऐकायला मिळते.
या स्वच्छता अभियानात रेल्वेने सर्व रेल्वे स्थानक स्वच्छ करण्यास सुरुवात केली. या मोहिमेत रेल्वेचे दहा वन स्थानक, तर वर्गातील ३३२ स्थानकांचा समावेश होता. या वन स्थानकातील दहामध्ये नाशिकरोड स्थानकाचा वा क्रमांक लागला आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ स्थानकाची निवड करण्यासाठी प्रवाशांची मते जाणून घ्यावी लागतात. याप्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एम. बी. सक्सेना आणि आरोग्य निरीक्षक जितेंद्र कोठावदे यांनी सांगितले की, स्वच्छ स्थानकासाठी केवळ फलाटच नाही, तर स्थानकाचा संपूर्ण परिसर, रेल्वे ट्रॅक, पिण्याचे पाणी, डास, माशा, कॅन्टीन, प्रतीक्षालय, शौचालय या सर्वांचा स्वच्छतेमध्ये विचार केला गेला. स्वच्छतेसाठी काॅस्टिक सोडा, फिनेल, ब्लिचिंग पावडर, सोडा अॅश, अल्काराइज स्टेन, फ्लाय किलर, वोडोलिन यांचा वापर करण्यात येतो. स्वच्छतेसाठी हेवी ड्यूटी स्क्रबर, जेट प्रेशर, वॉक बिहांइन्ड स्वीपर मशीन, मिनी स्क्रबर अशा अत्याधुनिक यंत्राचाही वापर केला जातो. असे सुपरवायझर गोपाल पथरोड यांनी सांगितले.

असा झाला नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा गौरव
{भारतातील ४०७ पैकी १० वन रेल्वे स्थानकात स्वच्छतेसाठी वा क्रमांक { महाप्रबंधक रेल्वे प्रशासन स्वच्छता शिल्ड { सदस्य विद्युत बोर्डच्या वतीने स्वच्छतेसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाला ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक

स्थानकात पूर्ण स्वच्छता
^आम्हीभुसावळपासूनआलो आहोत, मात्र नाशिकरोड स्थानकात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नसून, उलट अधिक स्वच्छता दिसली. छान वाटते. - सारिका जाधव, प्रवासी

तीन शिफ्टमध्ये काम
^२६ खासगी११ रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छता केली जाते. तीन शिफ्टमध्य स्वच्छता होते. ठिकठिकाणी ७९ डस्टबिन ठेवले आहेत. -जिंतेद्र कोठावदे, आरोग्य निरीक्षक

स्वच्छतेने ठरताे दर्जा
^स्थानकातील स्वच्छतेनेरेल्वेचा दर्जा समजला जातो. प्रवाशांशी निगडित वस्तू स्वच्छ राखण्याकडेही लक्ष देतो. - एम. बी. सक्सेना, स्थानक प्रबंधक
बातम्या आणखी आहेत...