आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik's 387 Students Select On Campus Interview

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कॅम्पस इंटरव्ह्यू’द्वारे ३८७ विद्यार्थ्यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- क.का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण संशोधन संस्थेच्या तब्बल ३८७ विद्यार्थ्यांना सन २०१४-१५ या काळात कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीची संधी मिळाली आहे. यातील दाेन विद्यार्थ्यांना तब्बल सात लाखांचे पॅकेज, तर इतर १५ विद्यार्थ्यांना पाच लाखांचे पॅकेज मिळाले आहे. इतक्या माेठ्या प्रमाणात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संधी मिळणारे हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. गतवर्षी महाविद्यालयातील ३०३ विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकऱ्या मिळाल्या होत्या.

सुमारे ५० कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे क. का. वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात क्रॉम्प्टन ग्रीव्हज, टीसीएस, एल अॅण्ड टी इन्फोटेक, केपीआयटी टेक्नॉलॉजी पुणे, एनव्हिडिया, पर्सिस्टन्स सिस्टिम, फीन आयक्यू, एरिज या नामवंत कंपन्यांनी महाविद्यालयास भेट देऊन सुमारे १२५ विद्यार्थ्यांची आणि २६ एमसीए अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड केली. द्वितीय सत्रामध्ये जेएसडब्लू स्टील्स, आयबीएम, ऋषभ इन्स्ट्रूमेंटस, इन्फोसिस, व्होडाफोन, ब्रिजस्टोन, विप्रो टेक्नॉलॉजी, भारतीय सैन्य दल, ईएसडीएस, डाटामॅटिक, नेटविन, इन्फोसोल्यूशन्स, विनजित टेक्नॉलॉजी, फ्लोर डॅनिअल, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बॉश आदींनी इंजिनिअरिंग, एमबीए आणि एमसीएच्या मुलांचे कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन सुमारे २७० विद्यार्थ्यांची निवड केली. दोन्ही सत्रे मिळून ३८७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
अद्यापदेखील मेकॅनिकल आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतील काही बहुराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यू घेत असून, या शैक्षणिक वर्षात ४०० च्यावर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतील, अशी अपेक्षा संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
अस्मिता, मुकेशला सात लाखांचे पॅकेज : यावर्षाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे वैशिष्ट्य म्हणजे, संगणक अभियांत्रिकीच्या अस्मिता गौतम मुकेश भारसाखळे यांना एनव्हिडिया या कंपनीने सात लाखांचे वार्षिक पॅकेज दिले. केमिकल इंजिनिअरिंगचे अजिंक्य देशमुख आणि नीलेश पगारे यांची दुबईच्या कन्सल्टंट कंपनीने पाच लाखांचे पॅकेज देऊन निवड केली. तसेच फ्लाेर डॅनिएल या नामांकित कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तेज दुबे कुणाल माेदी या विद्यार्थ्यांची साडेचार लाखांचे पॅकेज देऊन निवड केली आहे.
अशी झाली निवड प्रक्रिया...
वार्षिक पॅकेज विद्यार्थी संख्या
7 लाख 2
4 ते 6 लाख ३५
3 ते 4 लाख १७९
2 ते 3 लाख १३९
संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल विकासावर भर...
- कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवडीची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे संस्थेचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. के. शहाबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाने घेतलेले विविध प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र अवगत करण्यासाठी दिलेले प्रशिक्षण, गट चर्चा, अॅप्टिट्यूड टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू, टेक्निकल आणि नॉलेज स्पर्धा आदी. त्यातून विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल विकसित केले गेले.
डॉ .के. एन. नांदूरकर, प्राचार्य, क.का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण संशोधन संस्था