आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik's Amar Miyazi Selected For Race Across West America

‘रेस अक्राॅस वेस्ट अमेरिका’साठी नाशिकच्या अमर मियाजींची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका’साठी ( राॅ ) नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनमधील अमर मियाजी यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण स्पर्धा ही ४८ ते ५२ डिग्री तपमान असणाऱ्या अमेरिकेतील अॅरिझाेना या वाळवंटी प्रदेशातून जाणार असून, १४०० किलाेमीटरचे अंतर ९० तासांमध्ये पूर्ण करायचे असते.

उंच पर्वत आणि त्यानंतर तीव्र उतार यांचा सामना करत जाणाऱ्या या स्पर्धेत समुद्र सपाटीपासून ४०००० फूट उंची गाठायची असते. त्यात मुख्य सायकलपटूंचा सहभाग हा तर महत्त्वाचा असतोच, पण त्याचबरोबर त्यासोबत असणारे त्याच्या ‘क्रु मेंबर’ची सांघिक नियोजनपूर्ण कामगिरीदेखील अतिशय महत्त्वाची असते. त्यामध्ये मेहनत, जिद्द, चिकाटी, जागरण, शिस्त, धैर्य, टीका, अचानक घडून येणारे बदल, धोके या सर्व गोष्टींची जबाबदारी क्रु मेंबरवर सर्वाधिक असते. जगातील सर्वाधिक अवघड मानल्या जाणाऱ्या या सायकल रेसमध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनमधील अमर मियाजी यांच्या झालेल्या निवडीचे स्वागत शहरातील सायकलप्रेमींनी केले असून, त्यांना शुभेच्छा दिल्या अाहेत. महाजन बंधूंनंतर पुन्हा एकदा नाशिककर अमर मियाजी हे या स्पर्धेत सहभागी हाेत असल्याने या स्पर्धेबाबत उत्सुकता वाढली अाहे.

या रेसची वैशिष्ट्ये : जगातल्या सर्वात अवघड रेसचा सर्वात कठीण असा भाग मानला जाताे. अरिझोना वाळवंटी प्रदेशातून ५२ अंशांपर्यंत उष्णतेच्या तीव्र तपमानातून अतिशय अवघड चढाई, त्याचबरोबर तीव्र उतार अतिशय खडतर अशा परिस्थितीत सायकलपटूंना वैयक्तिकरीत्या कमीत कमी वेळेत थांबता १४०० किमीची ही स्पर्धा पूर्ण करायची असते.

या स्पर्धेसाठीच्या क्रु मेंबर्सचीही निवड करण्यात अाली अाहे
>मितेन ठक्कर : सायकलिंगकोच
>दिगंबर लांडे : फिजिओथेरपिस्ट
>विलास इंगळे : नेव्हिगेटर
>रोहन सोनवणे : टीमसमन्वयक, संपर्कप्रमुख यांची निवड करण्यात अाली अाहे.
त्याशिवाय, अमेरिकास्थित भारतीय नागरिक मुफद्दल रामपुरावाला, दुर्रात उशरफ यांच्यासह हरीश बैजल, जसपाल सिंघ बिरदी, मिलिंद धोपावकर, जीवन लोहारकर यांचेदेखील सहकार्य लाभणार अाहे.
>डॉ. देविका पाटील : वैद्यकीयमदतनीस, टीम मेंबर्सचे आरोग्य आणि मानसिक संतुलन सांभाळणे.
>अपूर्वा सोनावणे : यांच्याकडेटीमच्या आहारासाठी लागणाऱ्या गोष्टींचे नियोजन.