आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या बलसंपदेची ‘यशवंत’ शतकी वाटचाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुस्तीपटू,शरीरसाैष्ठवपटू, मलखांबपटू, जिम्नॅस्ट, कबड्डीपटू, खाे-खाेपटू, व्हाॅलीबाॅलपटू, बास्केटबाॅलपटू असे प्रत्येक खेळातील शेकडाे खेळाडू घडवणारी नाशिकची एकमेव संस्था शतकाच्या उंबरठ्यावर उभी असून, उद्यापासून या संस्थेच्या शतकमहाेत्सवी वर्षाचा प्रारंभ हाेत अाहे. गाेदावरीच्या पुरात वाहूनही पुन्हा नव्या जाेमाने उभी राहिलेली यशवंत व्यायामशाळा पुन्हा एकदा कात टाकण्याच्या तयारीत असून, त्याची मुहूर्तमेढ या शतकमहाेत्सवी वर्षात राेवली जाणार अाहे.

गाेदाकाठावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज संस्थानच्या प्रांगणात या व्यायामशाळेची स्थापना मार्च १९१६ राेजी झाली. त्यावरूनच या व्यायामशाळेचे नामकरण यशवंत असे करण्यात अाले हाेते. कृष्णाजी बळवंत महाबळ गुरुजी, त्रिंबक गाेविंद देशपांडे अाणि रंगनाथ कृष्णा यार्दी या तीन व्यायामप्रेमींनी ही संस्था स्थापली. काही वर्षे यशवंत व्यायामशाळा गाेदावरीकिनारी बहरू लागली. मात्र, १९३९ मध्ये गाेदावरीस अालेल्या महापुरात संपूर्ण व्यायामशाळा वाहून गेली. मात्र, तत्कालीन सर्व व्यायामप्रेमी नागरिकांनी जागेसाठी पाठपुरावा केल्यानंतर १९४७ मध्ये महात्मा गांधी रस्त्यावरील दाेन एकर जागा नाममात्र भाड्याने देण्यात अाली. त्यानंतर पुन्हा यशवंत व्यायामशाळा खऱ्या अर्थाने बहरू लागली.

मिस्टर युनिव्हर्सही अाले ‘यशवंत’मध्ये
संस्थेनेव्यायामपटू, शरीरसाैष्ठवपटू घडवत असताना विविध प्रकारच्या राज्य अाणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धादेखील भरवल्या. त्यात १९८४ मध्ये मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद डाेग्रा यांच्या उपस्थितीसह यशवंतमध्ये त्यांनी दाखवलेली प्रात्यक्षिके समस्त नाशिककरांच्या अाकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली हाेती. त्यावेळी घेण्यात अालेली ‘महाराष्ट्र श्री’ची स्पर्धादेखील भारतातील सर्वाधिक बक्षिसांच्या रकमेची असल्याने यशवंत व्यायामशाळेची कीर्ती देशभरात पाेहाेचली हाेती.

विविध खेळांच्या स्पर्धांचे अायाेजन
यंदाच्या शतकमहाेत्सवीवर्षात मलखांब, जिम्नॅस्टिक, कबड्डी, बास्केटबाॅल व्हाॅलीबाॅलच्या स्पर्धा अायाेजित केल्या जातील. संस्थेची इमारत जीर्ण झाल्याने त्या जागी दाेन मजली हाॅल उभे करायचे असून, या कामासाठी निधी संकलन भूमिपूजन यंदाच्या शतकमहाेत्सवी वर्षात केले जाणार अाहे. - दीपक पाटील, अध्यक्ष, यशवंत व्यायामशाळा