आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास आराखड्यातील त्रुटींसंदर्भात तज्ज्ञ समिती, महापौरांचे आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नवीन विकास आराखड्यात आरक्षणांची संख्या कमी झाल्यामुळे एकीकडे स्वागत होत असले तरी, दुसरीकडे मात्र शहराच्या भविष्यकालीन विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या तरतुदी वा फेरबदल करून घेणे अनिवार्य असल्याचा सूर ‘दिव्य मराठी’च्या राऊंड टेबलमध्ये व्यक्त करण्यात आला. विकास आराखड्यातील त्रुटी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाईल त्यानंतर सर्वांच्या शिफारशी लक्षात घेऊन विशेष महासभाही घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी यावेळी केली.
सर्वांच्या एकत्रित हरकती शासनाकडे पाठवून शहराच्या विकासाच्या दृष्टीने फायदेशीर असा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीदेखील महापौरांनी दिली.
गेल्या आठवड्यात शहर विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर त्याविषयी दोन मतप्रवाह पुढे आले. त्यात प्रामुख्याने आरक्षणे कमी झाल्यामुळे आणि वाढीव एफएसआयच्या फंड्यामुळे विकास आराखड्याचे स्वागत झाले, तर आरक्षणे कमी झाली असली तरी, संपादन करण्यासाठी लागणारे हजारो कोटी रुपये कोठून आणायचे याबाबत, तसेच छुप्या आरक्षणावरून आक्षेप घेतले गेले.
या साऱ्या पार्श्वभूमीवर विकास आराखड्यासंदर्भात शहरातील मान्यवरांचा नेमका मतप्रवाह जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने राऊंड टेबलचे आयोजन केले होते. त्यात बहुतांश जाणकारांनी मान्यवरांनी विकास आराखडा गेल्या वेळच्या तुलनेत चांगलाच असल्याचे मान्य करीत सध्याच्या आराखड्यात महत्त्वाचे कोणते बदल करणे गरजेचे आहे, त्याबाबत चर्चा केली. त्यानंतर महापौर मुर्तडक यांनी विकास आराखड्यातील विविध त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी शहरातील, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, आर्किटेक्ट, अॅडव्होकेट, नाशिक विकास आराखडा कृती समिती अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. या सर्वांकडून येणाऱ्या शिफारशी सूचना एकत्रित करून महासभेसमोर ठेवल्या जातील. त्यानंतर महासभेत नगरसेवकांमार्फत या विषयावर चर्चा घडवून ठरावाच्या स्वरूपात एक हरकतही शासनाकडे नोंदवली जाईल, असेही महापौर मुर्तडक यांनी या चर्चेदरम्यान स्पष्ट केले.
चर्चेतून पुढे आलेले महत्त्वाचे मुद्दे...
- जुन्या आराखड्याला झालेल्या विरोधाची नवा डीपी ही चांगली फलनिष्पत्ती.
- डीपी, विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली देशासाठी रोल मॉडेल.
- विकास नियंत्रणाचे नियम सुस्पष्ट; सकृतदर्शनी चांगला पण, अंमलबजावणी कठीण.
बातम्या आणखी आहेत...