आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashiks People Perches Behavior Issue, Divya Marathi

नाशिककरांनी मुहूर्तावर केली 75 कोटींची ‘अक्षय्य’ खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून मानल्या जाणार्‍या अक्षय्य तृतीयेला शुक्रवारी शहरवासीयांनी मनसोक्त खरेदी केली. कार, मोटारसायकल, स्कूटर या वाहनांपासून सुवर्णालंकार ते वास्तू खरेदीसाठी हा मुहूर्त विशेष लाभदायी मानला जात असल्याने बाजारात उत्साह संचारला असून, आकर्षक ऑफर्समुळे खरेदीचा टक्का गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढल्याने किमान 75 ते 80 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
गुढीपाडव्याच्या खरेदीनंतर बाजारात खर्‍या अर्थाने उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले, तोच उत्साह अक्षय्य तृतीयेलाही होता. लग्नसराई व गतवर्षी याच काळाच्या तुलनेत सोन्याचे घटलेले भाव, केंद्र सरकारकडून कार खरेदीवर घटविलेला 1 टक्का अबकारी कर व काही मॉडेल्सवर दिलेल्या सवलतीमुळे वाहन बाजारातही तेजी पाहायला मिळाली. इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेसचा बाजारातही उत्साह पाहायला मिळाल्याने गतवर्षापेक्षा बाजाराने मुसंडी मारल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
ग्राहकांनी संधीचे सोने केले
गतवर्षी 31,500 रुपये प्रतिदहा ग्रॅम असलेले चोख सोने शुक्रवारी 30,300 रुपयांच्या आसपास होते. यामुळे मुहूर्तावर खरेदीची संधी ग्राहकांनी साधली. -प्रसाद आडगावकर, संचालक, सुवर्णनक्षत्र
50 कोटी रुपयांची उलाढाल
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 50 कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याची माहिती मिळते आहे. किमान 200 फ्लॅटची नोंदणी शुक्रवारी झाली आहे. जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
दुचाकींची मागणी सुसाट
किमान 325 दुचाकींची डिलेव्हरी आम्ही दिली. गतवर्षाच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. अमोल येवले, विक्री व्यवस्थापक, साची होंडा
कार विक्रीचा टॉप गियर
गतवर्षी 67 कारच्या डिलेव्हरी अक्षय्य तृतीयेला दिल्या होत्या. या वर्षीचा विचार करता 160 कारच्या डिलेव्हरी आम्ही दिल्या आहेत. शहराचाच विचार करायचा झाल्यास एक हजाराच्या आसपास कारची डिलेव्हरी मुहूर्तावर झाल्याची शक्यता आहे. राजेश कमोद, महाव्यवस्थापक, सेवा ऑटोमोटिव्ह