आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik's People Standing Fund For J&k Affected People

जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांना नाशिककरांकडून मदतीचा हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जम्मू-काश्मीरमधीलपूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिककरही आघाडीवर असून पूर त्यानंतर उदभवणाऱ्या रोगराईचा धोका विचारात घेता शहरातून औषधे संकलित करून पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.

जम्मू-काश्मिरमधील सहा लाख लोकांना पुराचा फटका बसला असून, सध्या रोगराईचा धोकाही निर्माण होऊ लागला आहे. नाशिक जिल्‍हा केमिस्ट अ‍ॅँड ड्रगिस्ट असोसिएशनने औषध पुरवठ्यासाठी त्यांच्या सदस्यांना आवाहन केले असून, जितक्या अधिक प्रमाणात जनेरिक औषधांची मदत करता येईल, ति‍तकी औषधे मेडिकल चालकांनी द्यावीत असे आवाहन करतानाच औषध उत्पादक कंपन्यांनीही त्यांच्या प्रतिनिधींकडे सॅम्पलसाठी असलेल्या औषधांतून काही औषधे या मोठ्याहीमेत देण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे.

मोठी मदत होईल
जम्मूकाश्मीरमधील जनतेच्या मदतीसाठी नाशिककरांचा पुढाकार पाहून त्यांचे खूप कौतुक करावेसे वाटते. या उपक्रमामुळे पूरग्रस्तांना मोठी मदत होईल. - अधिककदम, संस्थापकबॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन

केमिस्ट भवनात द्या औषधे
केमिस्टभवनात सदस्यांनी औषधे जमा करावीत. औषधे पाठविताना आणि वाटताना अडचणी येणार नाही त्यासाठी व्यवस्थित पॅक करून द्यावीत. शक्य असल्यास जनेरिक मेडिसीन खरेदी करून तीही मदत स्वरूपात सदस्य देऊ शकतात. गोरखचाैधरी, अध्यक्ष,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

उपक्रमास हातभार लावावा
केवळदोन दिवसांत एक हजार ब्लँकेट जमा झाल्या आहेत. उपक्रमात नागरिकांचा वाढता समावेश लक्षात घेऊन सोमवारपर्यंत पाच हजारांहून अधिक ब्लँकेट्सची मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमास हातभार लावावा. कमलेशकोठारी, अध्यक्ष,जेएसजी

जैनसोशल प्लॅटिनम ग्रुपने बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या आवाहनानंतर प्लॅटिनम ब्लँकेट चॅलेंज ५,००० उपक्रमात बुधवारपर्यंत ९५० ब्लँकेट्स जमा केल्या. सोमवारपर्यंत हजार ब्लँकेट्स जमण्याचा विश्वास पारस लोहाडे यांनी व्यक्त केला.

"जेएसजी ग्रुप'ने या "दिव्य मराठी'तून उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर विक्रीकर आयुक्त सुमेरकुमार काले, अभिनेता चिन्मय उदगीरकर, प्रवीण खाबिया, रतन लथ, डॉ. अनिल झाल्टे, अजय ब्रह्मेचा, तुषार संकलेचा, सचिन शाह, अशोक कटारिया, राजेश हेमनानी, नितीन मुल्तानी, प्रशांत भटेवरा, दिनेश बागरेचा, ललित मोदी, गिरिष सावंत, स्मित कोठारी, चेतना साखला, अग्रवाल सखी मंच जीवो ग्रुप यांनीही पुढाकार घेतला.