आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमारेषेपलीकडील जग... १५ देश, ५० दिवस, २० हजार किलोमीटरचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘देशाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलणारे प्रांत, भाषा, जात, धर्म आणि त्याही पलीकडे उत्तम आदरातिथ्य, आपुलकीच्या भावनेने होणारी होणारी विचारपूस हे सर्व लंडन ते नाशिक या सफरीद्वारे अनुभवायला मिळाले...’ हे उद‌्गार आहेत, ग्लोब व्हीलर्सतर्फे ‘लंडन ते नाशकि’ असा १५ देशांचा, २० हजार किलोमीटरचा प्रवास ५० दिवसांत पूर्ण करून नाशकिला परतलेले अशोक समूहाचे आशिष कटारिया, गजरा उद्याेगाचे संचालक राजेंद्र पारख आणि सेवा ऑटोमोबाईल्सचे संचालक संजीव बाफणा यांचे.
पारख कटारिया पत्रकारांशी गप्पा मारताना म्हणाले, ‘सीमा रेषेपलीकडील जग ही भन्नाट संकल्पना या दौऱ्यामागे होती. १५ जानेवारीला ती मनात आली आणि मग पूर्णत्वासाठी व्हिसा, पासपोर्ट अन्य तांत्रकि बाबी पूर्ण केल्या. फेब्रुवारीला लंडन ते नाशकि व्हाया नेपाळ असा मार्ग निश्चित झाला. प्रवासासाठी टोयोटाची फॉर्च्युनर गाडी खरेदी करून ती जहाजाने लंडनला पाठविण्यात आली. मे रोजी लंडन येथून फ्लॅग ऑफ होऊन प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात झाली.’
बर्फाचे डोंगर, चढउताराचे-हिरवळीचे डोंगर, वाळवंटाचा काही भाग आणि बर्मामधील दाट जंगल पार करणे हे एक मोठे आव्हान होते, मात्र योग्य नियोजनाने ते यशस्वीरीत्या साध्य झाले. या मोहिमेच्या परतीच्या टप्प्यात नेपाळमधील भूकंपामुळे रस्ता खचलेला असल्याने बर्फातून जाणाऱ्या नव्या रस्त्याची निवड करावी लागली, त्यामुळे प्रवासाचे अंतर साडेपाच हजार किलोमीटरने वाढले, असे कटारिया यांनी सांगितले. आपल्या या अनोख्या प्रवासात आलेले विविध अनुभव या द्वयींनी सांगितले. सीमारेषेपलीकडील जगात निसर्गाचा अद‌्भुत नजारा तसेच त्याचे रौद्र रूपही दिसल्याचे त्यांनी सांगितले.
देश गरीब, पण मनाची श्रीमंती अपरंपार
कझाकीस्तान, म्यानमार यासारख्या गरीब आणि अवकिसित देशांत मनाची श्रीमंती अपरंपार असलेली माणसे पाहायला मिळाली. चीन, रशिया, युरोपमध्ये मात्र याच्या विपरीत अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. चीनमध्ये पायाभूत सुविधांचा वकिास भारताच्या तुलनेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...