आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनोरेल उभारणीत नाशिकच्या तरुणांचे योगदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबईत प्रारंभ झालेल्या मोनोरेलचा प्रदीर्घ काळ बोलबाला होत असताना, त्या मोनोरेलच्या कार्यात नाशिकच्या तरुणाईचेही योगदान लाभले आहे. मुंबईतील मोनोरेलच्या उभारणीत नाशिकमधील सुमारे 23 तरुणांनी योगदान दिले आहे.

मुंबईत मोनोरेलच्या उभारणीस प्रारंभ झाल्यानंतर देशभरातील विविध शहरांमधून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता करण्यात आली. त्यात नाशिकमध्ये 2009 आणि 2010 मध्ये झालेल्या मुलाखतींमधून 23 युवकांची निवड करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने स्थापत्य अभियंता तसेच सुरक्षेबाबत अनुभवी कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली होती.

मुंबईकरांची नवीन जीवनवाहिनी : मोनोरेल ही मुंबईची नवी जीवनवाहिनी असून, त्यात पहिल्या टप्प्यात चेंबूर ते वडाळा हे 9 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्यात आले असून, नुकतेच या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. दुसर्‍या टप्प्यात 11 किलोमीटरपर्यंत मोनोरेलचा मार्ग उभारण्यात येणार असून, या टप्प्याचे काम सन 2015 पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. नव्याने सुरू झालेल्या या मोनोरेलमुळे मुंबईकरांना दररोजच्या प्रवासासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

या नाशिककर तरुणांवर आहे जबाबदारी
नाशिकमधून निवड झालेल्या तरुणांमध्ये विकास गुडदे, अमोलकुमार सारडा, प्रणव भंडारी, निखिल भालेराव, चंदन चिपळूणकर, अमोल शिंदे, मनोज पगारे, अनुपकुमार श्रीवास्तव, संतोष पाटील, ललित येवलेकर, शिल्पेश इंदाप, शरद सांगळे, सागर गवळी, जीवन जाधव, विजय वर्मा, मंगेश कारेकर, भालचंद्र काकुळते, सुशांत भोसले, बाळकृष्ण आव्हाड यांचा सहभाग आहे. नाशिकमधीलच वैभव प्लेसमेंटच्या माध्यमातून ही निवड झाली असल्याचे संचालक श्रीधर व्यवहारे यांनी सांगितले.