नाशिक - येथे दोन दुचाकींमध्ये समोरा-समोर झालेल्या धडकेत एका पोलिस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नाशिकरोड येथे हा अपघात झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस उप-निरीक्षकाचे नाव रमेश साळी असे आहे. या अपघातात बाइकची धडक एवढी जोरदार होती की साळींचे शिर धडापासून वेगळे झाले. अंगावर काटा आणणाऱ्या या प्रसंगानंतर गर्दी केलेल्या स्थानिकांना ते पाहावले नाही. त्यापैकीच काहींनी झाडाची फांदी तोडून मृतदेह झाकला. यानंतर पोलिसांना दुर्घटनेची माहिती कळवली.