आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasik Cable Operators Told To Pay Tax Otherwise Their Transmission Will Be Closed

दंड भरा अन्‍यथा प्रक्षेपण बंद, केबलचालकांच्या मनमानीमुळे करमणूक विभागाचा निर्णय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केबलचालकांना वारंवार सूचना देऊनही त्यांची मनमानी सुरूच असल्याने आता जिल्हा प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेत थकबाकीदार केबलचालकांकडून दंडासह रक्कम वसूल केली जाणार आहे, तर दंडासह कर न भरणार्‍या केबलचालकांचे प्रक्षेपणच बंदच करण्याचा निर्णय घेतल्याने आता केबल चालकांना कुठल्याही स्थितीत कर भरावाच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतरही केबलचालक कर भरण्यास उत्सुक नाही. दिवसेंदिवस ही थकीत रक्कम वाढत असल्याने शासनाचे नुकसान होत आहे. परंतु, केबलचालक उच्च न्यायालयात करमणूक कर कमी करण्यासंदर्भात दाखल असलेल्या तक्रारीवरील निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याने कर भरण्याकडे काणाडोळा करीत आहेत. याआधी केबलचालकांना दिलासा देत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 60 केबलचालकांनी 20 लाख रुपये न्यायालयात भरले होते.