आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडे थकबाकीदार... अाता बाेजाचे हकदार, ४८ जणांवर कारवाईची महापालिकेकडून तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरपट्टीवसुलीतील घट महापालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अाता कर विभागाने बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर बाेजा चढवण्याची कारवाई सुरू केली अाहे. पहिल्या टप्प्यात ४८ बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या सातबाऱ्यावर पालिकेने थकबाकीच्या रकमेच्या दंडासहित भरपाई हाेईपर्यंत विक्रीसाठी हरकत असेल, अशी नाेंदही चढवली अाहे.

घरपट्टी वसुलीचे जवळपास ११५ काेटींचे उद्दिष्ट असताना महापालिकेला ३५ काेटींपर्यंतच्या माेठ्या तुटीचा यंदा सामना करावा लागला. घरपट्टी वसुलीसाठी यंदा प्रशासनाने जाेरदार प्रयत्न केले हाेते. लाेकांना वेळेवर बिलेही पाेहचवली हाेती. त्यानंतरही घरपट्टीत तूट अाली. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरुवातीला ७६ बड्या थकबाकीदारांना नाेटिसा दिल्या. त्यांच्याकडून २५ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी अपेक्षित हाेती. मालमत्ता जप्तीच्या नाेटिसा बजावल्यावर २८ थकबाकीदारांनी १२ लाख रुपये थकबाकी भरली.

उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी सांगितले की, ४८ थकबाकीदारांचा संपर्क झाला नसल्याने त्यांच्या मालमत्तेवर थकबाकीची नाेंद चढवून, दंड भरेपर्यंत १२ टक्के व्याज सुरू राहणार अाहे. अशा मालमत्ता विकताना संबंधितांना महापालिकेची ना-हरकत गरजेची ठरणार अाहे.