आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेसाठी काँग्रेस महाअाघाडीची माेर्चेबांधणी, मनसेला सामील करून घेण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकानिवडणूक सहा महिन्यांवर अाली असताना एकापाठाेपाठ एक नगरसेवक शिवसेना भाजपची वाट धरत असल्याचे लक्षात घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीने माकपला साेबत घेऊन महाअाघाडीसाठी माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. काँॅग्रेस, राष्ट्रवादी माकपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर अाघाडीचा चेंडू टाेलवल्यानंतर शनिवारी (दि. २२) सायंकाळी ज्येष्ठ नगरसेवक उत्तम कांबळे यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. दरम्यान, मनसेलाही अाघाडीत सामील करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे.

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, मनसेचे माजी सभागृहनेते शशिकांतजाधव यांच्यासह नगरसेवकांनी शिवसेना भाजपत प्रवेश केला. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान नगरसेवकही युतीच्या वाटेवर असल्याचे बाेलले जात अाहे. त्यामुळे अाधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीची अवस्था बिकट हाेत चालली अाहे. ही बाब लक्षात घेत यंदा दाेन्ही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम अापल्यातील भांडण विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला अाहे. पक्षश्रेष्ठींनी अाघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर साेपवल्यामुळे उशीर करण्यात अर्थ नसल्याचे लक्षात घेत दाेन्ही कांॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यात कांॅग्रेसकडून शहराध्यक्ष शरद अाहेर, गटनेते शाहू खैरे, शिवाजी गांगुर्डे, शैलेश कुटे, अाकाश छाजेड, नरेश पाटील, राहुल दिवे, लक्ष्मण जायभावे, उद्धव निमसे, वत्सला खैरे, समीना मेमन अादी; तर राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रकाश मते, देविदास पिंगळे, अर्जुन टिळे, विश्वास ठाकुर, निवृत्ती अरिंगळे अादी पदाधिकारी उपस्थित हाेते. प्रामुख्याने बैठकीत मतभेद बाजूला ठेवून दाेन्ही कांॅग्रेसमध्ये प्राथमिक जागा वाटपाच्या गरजेचा सूर व्यक्त झाला. जेणेकरून, दाेन्ही पक्षांतील पडझड थांबून माेर्चेबांधणीसाठी गती मिळेल. माकपलाही साेबत घेण्याचा विचार असून त्या दृष्टीने अामदार जीवा पांडू गावीत, डाॅ. डी. एल. कराड, गटनेते तानाजी जायभावे या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा हाेणार अाहे.

मनसेशी बाेलणी करणार
महापालिकेत सध्या मनसेसाेबत काँग्रेस-राष्ट्रवादीचा संसार सुरू अाहे. पहिल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस विराेधात हाेते. त्यानंतर शेवटच्या अडीच वर्षांत भाजपने साथ साेडल्यावर मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला साेबत घेऊन सत्ता टिकवली. त्यामुळे हाच पॅटर्न नाशिकमध्ये पुढेही चालू ठेवावा, असाही मतप्रवाह पुढे अाला अाहे. सध्या मनसेची अवस्था नाजूक असून, २१ नगरसेवकांनी पक्षाला रामराम केला अाहे. याबराेबरच उर्वरित नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत अाहेत. त्यामुळे मनसेला महाअाघाडीत सामील करून शिवसेना भाजपला टक्कर देण्याची रणनीती अाखली जात अाहे. शिवसेना भाजपकडून मनसेला साेबत घेण्याची शक्यता कमी असल्यामुळे महाअाघाडीच्या गळाला लावण्याचा प्रयत्न अाहे.
बातम्या आणखी आहेत...