आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वीजजोडणीसाठी आता बिल, एनओसीची गरज नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवीनवीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणचे मोबाइल अॅपच्या माध्यमातून चोवीस तासांत वीजजोडणी करण्याची महावितरण कंपनीकडून सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर नवीन वीजजोडणीसाठी लागणारे इतर अनावश्यक कागदपत्रेही देण्याची गरज नसल्याचे अध्यादेश शासनाकडून काढण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आता नवीन जोडणी सुलभ होणार असून, मोजकी कागदपत्रे देण्याची गरज पडणार आहे.

नवीन वीजजोडणी करायची असेल तर महिना-महिनाभर वीज वितरण विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. तसेच, नवीन वीजजोडणीसाठी शेजारी राहणाऱ्यांची कागदपत्रे, त्यांची एनआेसी, वीजबिल, प्रतिज्ञापत्र इत्यादी अनावश्यक कागदपत्रे लागत होती. मात्र, आता नवीन वीजजोडणीसाठी कोणत्याही प्रकारची अनावश्यक कागदपत्रे लागणार नसल्याचे शासनाने अध्यादेशात म्हटले आहे.

या अध्यादेशामुळे नवीन वीजजोडणी सुलभ झाली असून, फक्त तीन ते चार कागदांवरच नवीन वीजजोडणी होणार आहे. त्याचबरोबर नवीन वीजजोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून चोवीस तासांत वीजजोडणी विद्युत महावितरण कंपनीकडून सुरू करण्यात येणार आहे. तसेच, नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया थेट वीजजोडणीच्या ठिकाणाहूनच करता यावी यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅपची निर्मिती केली आहे.

त्यामुळे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज प्राप्त होताच त्याबाबत कार्यालयीन, तांत्रिक अन्य माहितीची नोंद महावितरणच्या प्रणालीत आॅनलाइन करण्याची सोय अभियंता कर्मचाऱ्यांना या अॅपद्वारे आता शक्य होणार आहे.

ग्राहक आणि संबंधित कर्मचारी दोघांचेही काम अॅपमुळे हलके होणार आहे. तसेच चोवीस तासांतच नविन वीजजोडणी करण्यात येणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत ही सुविधा सुरू करण्यात आली असून, नाशकात लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मोजक्याच कागदपत्रांवर वीजजोडणी
नवीनजोडणीसाठीशेजारी राहणाऱ्याच्या वीजबिलाची मागणी यापूर्वीच्या पद्धतीनुसार केली जात होती. मात्र, आता नवीन अध्यादेश आल्यामुळे त्याच्यासह इतर अनावश्यक कागदपत्रांची गरज भासणार नाही. -प्रशांत पराते, अतिरिक्त उपअभियंता, महावितरण ग्राहक सेवा केंद्र

नागरिकांचा त्रास होणार कमी
वीजजोडणीसाठीअर्ज केल्यानंतर महिनोंमहिने वीज वितरणच्या कार्यालयात ग्राहकाला चकरा माराव्या लागत होत्या. आता मात्र महावितरणच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून चोवीस तासांत वीजजोडणीच्या सुविधेमुळे ग्राहकांचा हा त्रास वाचणार असून चकराही माराव्या लागणार नाही. तसेच शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे कागदपत्रेही कमी लागणार आहे. त्यामुळे कागदपत्रांमुळे होणारा त्रासही वाचणार आहे.
बातम्या आणखी आहेत...